Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंकांचं प्रदर्शन

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Delhi anka

मुक्तपीठ टीम

मराठी साहित्याची परंपरा मोठी असून यामध्ये दिवाळी अंक मराठी भाषेचं लेणं ठरले आहे. याचा सुगंध राजधानीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून केल जात असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी काढले.

महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात आज ‘दिवाळी अंक प्रदर्शना’चे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी पाटील यांचे स्वागत शाल, रोपटे आणि दिवाळी विशेषांकाचा संच भेट देऊन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय केंद्राचे कर्मचारी यांच्यासह कॅनडा राजदूत कार्यालयाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा लेखिका अर्चना मिरजकर उपस्थित होत्या.

पाटील म्हणाले, मराठी वाचक चोखंदळ असून तो अस्सल, दर्जेदार वाचन साहित्याला मान देतो. या वाचनाला दिवाळी विशेषांकांची जोड हा वाचकांसाठी तसेच लेखकांसाठी विशेष देणे आहे. दिवाळी विशेषांक हा कैवल्याचा आनंद देत असून या माध्यमातून लेखक, चित्रकार, पत्रकार घडत असतात. दिवाळी विशेषांकांची परंपरा ही दुर्गा पूजानिमित्त बंगालमध्ये सुरू झाली. ती मराठी लेखकांनी दिवाळीनिमित्त शंभर- सव्वाशे वर्षापूर्वी सुरू केली. आज ही परंपरा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनून अधिक वृद्धिंगत होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

परिचय केंद्र दिवाळी अंकांचे विशेष प्रदर्शन राजधानी दिल्लीत आयोजित करीत असल्यामुळे येथील मराठी वाचकांसाठी, पत्रकारांसाठी, संसद सदस्यांसाठी ही पर्वणी ठरत असल्याचे पाटील म्हणाले.

विश्वास पाटील हे सिद्धहस्त कादंबरीकार असून ते भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते. पानीपत, झाडाझडती, संभाजी, महानायक अशा सरस, वाचनप्रिय ऐतिहासिक तसेच सामाजिक भान असणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या कादंबऱ्या अनेक भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. झाडाझडती या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी पानीपत कादंबरी लिहितांना दिल्ली, हरियाणा आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खाणाखुणांच्या आठवणींना उजाळा दिला.

पाटील लिखित ‘शिवाजी महासम्राट कांदबरी’चा पहिला खंड इंग्रजीमध्ये वेस्टलँड प्रकाशनाने मंगळवारी प्रकाशित केला.

आजपासून ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन वाचकांसाठी खुले

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकित प्रकाशकांसह नवोदित प्रकाशकांचे 90 च्या वर दिवाळी अंक मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये थिंक पॉझिटिव्ह, महाराष्ट्राची जत्रा, किशोर, कालनिर्णय, दिवाळी आवाज, मिळून साऱ्याजणी, तारांगण, माहेर, मार्मिक, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, लोकप्रभा, मिडिया वॉच, लोकमत दीपोत्सव, चपराक, उत्तम अनुवाद, गोंदण, शब्दगांधार, प्रतिबिंब, कथाश्री, अनघा, किल्ला, अक्षरभेट, अलका, ऋतुरंग असे एकापेक्षा एक सरस वाचनीय दिवाळी अंक परिचय केंद्रात वाचकांसाठी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन आजपासून ग्रंथालय सदस्यांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहील.

 


Tags: delhiDiwali Issuegood newsMaharashtra Introduction CenterMarathi Languagemarathi literaturemuktpeethSenior Literary Vishwas Patilघडलं-बिघडलंचांगली बातमीज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटीलदिल्लीदिवाळी अंकमराठी भाषामराठी साहित्यमहाराष्ट्र परिचय केंद्रमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याची डेन्मार्कच्या राजदुतांची घोषणा

Next Post

सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित

Next Post
Cultural Affairs Department

सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!