मुक्तपीठ टीम
बदाम आकाराने लहान असले तरी, पोषक तत्वांनी समृद्ध असतात. बदामाच्या गुणधर्मांमुळे बदामाला आयुर्वेदातही महत्त्व आहे. तसेच, जर लठ्ठपणाने कोणी त्रस्त असेल तर, काळजी करू नका. एका नवीन संशोधनात असे समोर आले आहे की बदामाचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणाही कमी होतो. तसेच, त्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर बदाम ठराविक प्रमाणात खाणे सुरू करा.
भारतासह जगभरातील लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या अवलंबतात. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार बदामाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
बदामाचे सेवन! शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत
- मिळालेल्या माहितीनुसार बदाम अतिरिक्त कॅलरी कमी करण्यास मदत करतात.
- ३०-५० ग्रॅम बदामांचा नाश्ता लोकांना दररोज कमी कॅलरी खाण्यास प्रोत्साहित करू शकतो.
- बदामामध्ये प्रोटीन, फायबर, अनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात आढळतात. जे आपल्या शरीराला पोषक तत्वे देतात आणि आपली भूक नियंत्रित ठेवतात.
यासोबतच बदामाच्या सेवनाने शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवता येते. हे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. याव्यतिरिक्त, ते डिस्लिपिडेमियाशी संबंधित लक्षणे कमी करून हृदयविकारापासून संरक्षण देखील करू शकते. असे म्हटले जाते की, यामध्ये असलेले फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदय निरोगी ठेवते.