मुक्तपीठ टीम
कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी दिलासाची बातमी आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने रिलायन्स जियोला अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. रिलायन्स जियोची उपकंपनी असलेल्या रिलायन्स प्रोजेक्ट्स आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेसने रिलायन्स इन्फ्राटेल विकत घेण्यासाठी बोली लावली होती. या कंपनीकडे रिलायन्स कम्युनिकेशनचे टॉवर आणि फायबर मालमत्ता आहे. एनसीएलटीने मुकेश अंबानींची कंपनी जियोला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एस्क्रो खात्यात ३ हजार ७२० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे.
६ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव देण्यात आला…
- रिलायन्स इन्फ्राटेलचे अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी जियोने ६ नोव्हेंबर रोजी एस्क्रो खात्यात ३,७२० कोटी रुपये जमा करण्याची ऑफर दिली होती.
- रिलायन्स इन्फ्राटेल प्रत्यक्षात दिवाळखोरीला आली आहे.
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जियोने नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांनी व्यवस्थापित केलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या कर्जबाजारी उपकंपनीचे टॉवर आणि फायबर मालमत्ता विकत घेण्यासाठी३ हजार ७२० कोटी रुपयांची बोली लावली होती.
कंपनीचे ४३ हजार ५४० मोबाईल टॉवर!!
- जियोच्या रिझोल्यूशन प्लानला ४ मार्च २०२० रोजी कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) ने १०० टक्के मतांनी मंजुरी दिली.
- आरआयटीएलकडे देशभरात सुमारे १.७८ लाख मार्ग किलोमीटर आणि ४३ हजार ५४० मोबाइल टॉवर्सची फायबर मालमत्ता आहे.