मुक्तपीठ टीम
सध्याच्या वातावरणात केवळ भारतातच नाही तर जगभरात पाणी कपातीचे संकट आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोषणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सातत्याने वाढत आहे. काही देशांमध्ये पाण्याचा दुष्काळ पडला आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काही कंपन्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. इस्रायलच्या वॉटरजेन कंपनीनेही या दिशेने पाऊल उचलले आहे.
इस्रायलच्या ‘या’ कंपनीचा हवेपासून पाणी बनवणाऱ्या मशीनचा शोध! कारमध्येही बसवता येणार
- इस्रायलच्या वॉटरजेन कंपनीने हवेतून शुद्ध पाणी बनवणारे मशीन विकसित केले आहे.
- कारमध्ये मशीन बसवण्यातही कंपनीला यश आले आहे. यामुळे हे तंत्र अधिक प्रभावी झाले आहे.
- कंपनीचे म्हणणे आहे की, ही कार कोणत्याही ब्रँडची असू शकते, एकदा ही मशीन बसवल्यानंतर ती सामान्य कार राहणार नाही.
- कारच्या ट्रंकमध्ये हे मशीन बसवण्यात आले आहे.
- पाणी देण्यासाठी नळ गाडीच्या गिअरबॉक्सजवळ ठेवला आहे.
- सर्व मॉडेल्समध्ये मशीन बसवण्यासाठी कंपनी अनेक कार उत्पादकांशी चर्चा करत आहे.
- वॉटरजेनने आधीच वॉटर जनरेटर बनवले आहेत, जे घर आणि ऑफिसमध्ये बसवले जात आहेत.
तेल अवीव येथील कंपनीच्या मुख्यालयाच्या छतावरील वॉटर जनरेटर २४ तासांत ८०० ते ९०० लिटर पाणी तयार करतो. अशा प्रकारे बनवलेल्या पाण्याची किंमत प्रति लिटर ५० ते ६० पैसे आहे.
घरगुती वापरासाठी बनवलेले मशीन २४ तासांत ३० लिटर पाणी बनवू शकते. हवेतील २० टक्के ओलावा मशीन सुरळीत चालण्यासाठी पुरेशी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यंत्राद्वारे हवेतील ओलावा शोषून तयार केलेल्या पाण्यात खनिजे मिसळली जातात, जेणेकरून पाणी पौष्टिक तसेच शुद्ध राहते.
‘या’ मशिनची भारतातही मागणी
- भारतीय कंपनी एसएमव्ही इस्रायली कंपनीसोबत काम करत आहे.
- भारतातही या मशीनला मागणी आहे.
- वॉटरजेनचे सीईओ माया मुल्ला म्हणाले, “आम्हाला घर आणि ऑफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन्ही मशीन्ससाठी भारतातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय बाजारात त्याची किंमत २.५० लाखांपासून सुरू होते. शाळा-कॉलेज, आर्मी बेस कॅम्प, हॉस्पिटल्स, निवासी इमारती, बांधकाम स्थळे, रिसॉर्ट्स, उद्याने आणि पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी ही यंत्रे बसवता येतील.