मुक्तपीठ टीम
ब्रिटनने आर्थिक मंदी घोषित केली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगातील इतर देशांनाही त्याचा परिणाम जाणवेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी म्हटले आहे की, ब्रिटन सध्या मंदीतून जात आहे. मंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकुचित होऊ शकते.
ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचे संकट… अर्थमंत्र्यांनी दिली याबाबत माहिती
- जगभरात ऊर्जा संकट, महागाई यावर चर्चा होत आहे.
- जगातील अनेक देश आर्थिक संकटातून जात आहेत.
- ब्रिटनला मंदीतून दिलासा देण्याची योजनाही त्यांनी तयार केली आहे.
- देश सध्या एका नाजूक टप्प्यातून जात आहे, अशा परिस्थितीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तरच आपण देशातील लोकांना मंदीच्या भीतीतून बाहेर काढू शकतो.
आर्थिक मंदी म्हणजे काय?
- मंदी हा अर्थव्यवस्थेचा कालावधी आहे ज्यामध्ये देशाचा जीडीपी सलग दोन तिमाहीत घसरत राहतो.
- मंदीमुळे देशात महागाई, बेरोजगारी यासह अनेक समस्या वाढू लागतात.
- मंदीमुळे सर्वसामान्यांचे उत्पन्न घटते आणि शेअर बाजारात घसरण सुरू होते.
- आर्थिक मंदीच्या काळात देशातील लोकांकडे पैशांची कमतरता भासू लागते. त्यामुळे बाजारातील मागणीवर परिणाम होतो. मागणीचा थेट पुरवठ्याशी संबंध असतो. म्हणजेच मागणी कमी झाल्याने उत्पादनातही घट होऊ लागते.
- अशा परिस्थितीत कंपन्या कर्मचार्यांना कामावरून काढले जाते. देशातील बेरोजगारी आणखी वाढते.
आर्थिक मंदी आहे हे कसे समजते?
- जेव्हा देशाची अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत घसरते तेव्हा त्याला मंदी म्हणतात.
- जेव्हा अर्थव्यवस्थेची वाढ सलग अनेक तिमाहीत वाढण्याऐवजी घसरायला लागते, तेव्हा असे म्हटले जाते की देश आर्थिक मंदीच्या परिस्थितीतून जात आहे.