मुक्तपीठ टीम
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाने सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. यावर्षी १०वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ११वीत शिकणाऱ्या अविवाहित मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नोंदणी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov ला भेट द्यावी लागेल. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२२ निश्चित करण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थिनींच्या अर्जांची १२ डिसेंबरपर्यंत पडताळणी करावी, असे सर्व शाळांना सांगण्यात आले आहे.
सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपविषयी माहिती…
- एकुलती एक मुलगी असणाऱ्यांना सीबीएसईकडून शिष्यवृत्ती दिली जाते.
- सीबीएसई शाळांमधून १०वी उत्तीर्ण झालेल्या आणि CBSE संलग्न शाळांमधून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११वीमध्ये शिकत असलेल्या मुली सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२ साठी अर्ज करू शकतात.
- बोर्डाने नोंदणीची मुदत वाढवली आहे. सीबीएसई गुणवंत विद्यार्थिनींना सिंगल गर्ल चाइल्ड शिष्यवृत्ती प्रदान करते.
- २०२१ मध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींना रिन्यूसाठी अर्ज करावा लागेल.
- मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पालकांच्या प्रयत्नांना मान्यता देणे आणि गुणवंत विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया
- CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर जा.
- त्या लिंकवर क्लिक करा, ‘सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप’ या लिंकवर क्लिक करा.
- नवीन टॅबवर, आवेदन प्रकार(application type) निवडा.
- अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- ते सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.