मुक्तपीठ टीम
राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्राची आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. आजच्या नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत.
समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?
- यापूर्वीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त बोलले होते.
- औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं.
- महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले.
- चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?
- मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही.
- प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं.
- शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.
- त्यांच्या विधानावरुनही राज्यात गदारोळ झाला होता.
सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य!!
- भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता.
- त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, सावित्री बाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे १३ वर्ष होतं.
- कल्पना करा ही लहान मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील?असं वक्तव्य कोश्यारींनी केलं.
- पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं.
नेहरूंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेमुळे भारत कमकुवत
- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे.
- त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला,” असंही विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.
गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही..
- “राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवळ पैसा कमवला नाही, तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली आणि गोरगरिबांची सेवा केली.
- हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे.
- हा समाज जातो तेथे आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो.
- महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही.
- मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही