मुक्तपीठ टीम
भारतात अॅपलच्या iPhone वर 5G सेवा सुरू झाली आहे. आयफोन यूजर्ससाठी iOS 16.2 चा सार्वजनिक बीटा रोल आउट झाला आहे. या अपडेटमुळे आयफोन यूजर्सना भारतात एअरटेल आणि जियो 5G चा सपोर्ट मिळेल. मात्र, या दोन्ही कंपन्यांची 5G सेवा सध्या निवडक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. iOS 16 बीटा प्रोग्रामचा भाग असलेल्या यूजर्सना हे सार्वजनिक बीटा सॉफ्टवेअर अपडेट मिळणे सुरू होईल. दूरसंचार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 5G सॉफ्टवेअर अपडेटद्वारे मिळेल आणि डिसेंबरपर्यंत सर्व आयफोनवर ही सेवा सुरू केली जाईल.
कोणत्या iPhones ला अपडेट मिळेल?
- अॅपल iOS 16 5G बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम भारतात लाइव्ह झाला आहे.
- एअरटेल आणि जियो यूजर्स आता सुपरफास्ट 5G चा अनुभव घेऊ शकतात.
- iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE च्या थर्ड जेनरेशन मॉडल्सवर यूजर्स डिसेंबरमध्ये सार्वजनिकरीत्या उपलब्ध होण्यापूर्वी अॅपलच्या iOS 16 बीटा सॉफ्टवेअर प्रोग्रामचा भाग म्हणून 5G चा अनुभव घेऊ शकतात.
अॅपल iOS 16 5G च्या बीटा प्रोग्रामद्वारे, सॉफ्टवेअर सार्वजनिकपणे उपलब्ध होण्यापूर्वी यूजर्स प्री-रिलीझ सॉफ्टवेअर वापरून नवीन फिचर्सचा अनुभव घेऊ शकतात. अॅपल 5G बीटा देशातील वैध अॅपल आयडी असलेल्या प्रत्येक यूजर्ससाठी खुला आहे.
iOS 16.2 बीटा डाउनलोड कसा करायचा?
- अॅपल iOS 16.2 Beta चे अपडेट डाउनलोड करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या iPhone च्या Settings मध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट तपासावे लागेल.
- जर यूजर्सनी बीटा प्रोग्रामसाठी नोंदणी केली असेल तर त्यांना हे अपडेट मिळेल.
- इतर यूजर्सना आता या अपडेटसाठी प्रतीक्षा करावी लागेल.