मुक्तपीठ टीम
इंडियन ऑइलमध्ये मॅकेनिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, इलेक्ट्रिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, टेलीकम्युनिकेशन अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निशियन अॅप्रेंटिस, असिस्टंट-एचआर टेक्निशियन अॅप्रेंटिस, अकाउंटंट ट्रेड अॅप्रेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर- फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर- स्कील ट्रेड अॅप्रेंटिस या पदांसाठी एकूण ४६५ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१, २ आणि ३ साठी- ५०% गुणांसह संबंधित विषयात आयटीआय किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.४ आणि ५ साठी- पदवीधर
- पद क्र.६- १२वी उत्तीर्ण
- पद क्र.७- १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://www.iocl.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://plapps.indianoil.in/PLApprentice/user/main?adv_no=OQ==&Digest=qB1UN4YsLrV5SBh47ymR/A
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1sGVufKmiq_pxduPliUX1LL6UfRf0lzWR/view