मुक्तपीठ टीम
दिल्ली उच्च न्यायालयाने अॅमेझॉनवर किरकोळ विक्रेत्यांना ‘रूह अफजा’ या ब्रँड अंतर्गत पाकिस्तानमध्ये बनवलेले शरबत विकण्यास प्रतिबंध केल आहे. हा भारतातील हमदर्द कंपनीच्या मालकीचा ब्रँड आहे. पाकिस्तानमध्ये उत्पादित केलेले शरबत एकाच कंपनीच्या ब्रँड नावाने भारतात विकले जात आहे. हमदर्द नॅशनल फाऊंडेशन (इंडिया)च्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाने हमदर्द कंपनीच्या बाजूने निकाल लावत अॅमेझॉनला पाकिस्तानमध्ये बनवलेली इतर उत्पादने काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. रूह अफजा भारतात शतकाहून अधिक काळापासून विकला जात आहे. हमदर्दने १९०७ मध्ये ‘रुह अफजा’ हे चिन्ह स्वीकारले होते. कंपनी या ब्रँड नावाखाली दरवर्षी २०० कोटींहून अधिक किमतीची उत्पादने विकते.
ट्रेडमार्क उल्लंघनाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचा आदेश…
- हमदर्द नॅशनल फाऊंडेशन (इंडिया) आणि हमदर्द दवाखाना यांनी दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचा आदेश आला.
- गोल्डन लीफ नावाची कंपनी अॅमेझॉन इंडियावर ‘रूह अफजा’ या ट्रेडमार्कखाली आपली उत्पादने विकत होती.
- फिर्यादीने असेही नमूद केले की त्याने तीन विक्रेत्यांकडून अॅमेझॉन प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी केल्या होत्या आणि हे उत्पादन हमदर्द लॅबोरेटरीज (वक्फ) पाकिस्तानने तयार केल्याचा दावा केला होता.
न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी सांगितले की, हमदर्दच्या ‘रुह अफजा’ या चिन्हाचे उल्लंघन करताना इतर कोणतीही बाब आढळल्यास, ती अॅमेझॉन इंडियाच्या निदर्शनास आणून दिली जाईल आणि माहिती तंत्रज्ञान अंतर्गत सूचित केले जाईल. डिजिटल मीडियासाठी मार्गदर्शक तत्त्वे आचारसंहिता कायद्यानुसार काढली जातील.