मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, यामुळे सरकारने फेस मास्कची सक्ती हटविली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आता प्रवासादरम्यान मास्क लावणे बंधनकारक नसेल. तरीही विमान प्रवासादरम्यान मास्क लावणे एच्छिक करतानाच, सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
विमान प्रवासादरम्यान मास्क घालण्याची सक्ती नाही…
- आतापर्यंत विमान प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक होते.
- मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, कोरोना व्यवस्थापन प्रतिसादासाठी श्रेणीबद्ध दृष्टिकोनाच्या सरकारच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
- आता विमान प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक नाही.
- कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे परंतू कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता, सर्व प्रवाशांनी मास्क / फेस कव्हर घालण्याला प्राधान्य द्यावे.
गेल्या २४ तासात कोरोनाच्या ५०१ नव्या रुग्णांची नोंद!
- भारतात गेल्या २४ तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे ५०१ नवीन रुग्ण आढळले आहेत.
- देशात आतापर्यंत बाधित लोकांची संख्या ४,४६,६६,६७६ झाली आहे.
- उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७.९१८ वरून ७,५६१ वर आली आहे.
- रुग्णांची बरी होण्याची राष्ट्रीय संख्या ९८.७९ टक्के आहे.
- देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे.
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट, बुधवार , १६ नोव्हेंबर २०२२
- काल राज्यात १५६ नवीन रुग्णांचे निदान .
- काल १९१ रुग्ण बरे,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८५,४९९ करोना बाधित रुग्ण बरे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६% एवढे झाले आहे.
- राज्यात काल १ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५४,७६,०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३४,७८३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात एकूण ८८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.