मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच एक जबरदस्त फिचर लॉंच केले आहे, यामुळे अनेक सुविधा मिळतील. व्हॉट्सअॅपवर कम्युनिटी फिचर आणण्यात आले आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हे फिचर जागतिक स्तरावर आणले गेले आहे. मात्र, प्रत्येकाला ही सुविधा मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
या फिचरचे वैशिष्ट्य काय असणार?
- व्हॉट्सअॅपने नुकतेच कम्युनिटीज हे नवीन फिचर लाँच केले आहे.
- हे फिचर यूजर्ससाठी खूप उपयुक्त आहे.
- याच्या मदतीने ५० वेगवेगळ्या ग्रुप्सना एका कम्यूनिटीत जोडू शकतो.
- व्हॉट्सअॅपनुसार, आता यूजर्स एकाच ठिकाणी अनेक ग्रुप्सशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतात.
- व्हॉट्सअॅप हळूहळू हे फिचर आणत आहे. येत्या काही आठवड्यांत ते सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
कम्युनिटी फिचरबाबत महत्त्वाच्या सूचना
- कम्युनिटी फिचरमध्ये जास्तीत ५०पर्यंत गट जोडू शकता.
- यात ५ हजारांपर्यंत मेंबर्स जोडले जाऊ शकतात.
- कोणीही या फिचरमध्ये अॅड होऊ शकेल.
व्हॉट्सअॅप कम्युनिटी फिचरचा कसा वापर करावा?
- सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
- आता New Chat वर टॅप करा आणि New Community निवडा.
- आता Get Started पर्यायावर टॅप करा.
- यानंतर ग्रुपचे नाव, डिस्क्रिप्शन आणि प्रोफाइल फोटो टाका. लक्षात ठेवा की कम्यूनिटीचे नाव २४ कॅरेक्टरपेक्षा जास्त असू नये.
- कॅमेरा आयकॉनवर टॅप करून डिस्क्रिप्शन आणि कम्यूनिटी आयकॉन देखील जोडू शकता.
- आता नवीन गट तयार करण्यासाठी किंवा समुदायामध्ये विद्यमान गट जोडण्यासाठी नेक्स्टवर टॅप करावे लागेल.
- या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, क्रिएटवर टॅप करा. असे केल्याने WhatsApp कम्यूनिटी तयार होईल.