मुक्तपीठ टीम
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा हे नेहमीच त्यांच्या ट्वीटसाठी चर्चेत असतात. कधी ते ट्वीट प्रेरणादायी असतात तर कधी गंमतीदार असतात. आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह आहेत आणि सोशल मीडियावर देश-विदेशातील घडामोडींवर भरपूर प्रतिक्रिया देत असतात. आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच आपल्या फॉलोअर्ससोबत देशातील शेवटच्या चहाच्या दुकानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि ‘जय हो’ असे ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.
हा फोटो शेअर करत ट्विट करण्यामागचे कारण काय?
- देशातील शेवटच्या चहाच्या दुकानातही यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध झाली आहे.
- हे दुकान समुद्रसपाटीपासून १० हजार ५०० फूट उंचीवर आहे.
- या उंचीवर यूपीआय पेमेंटची सुविधा मिळते.
- याचा अर्थ असा आहे की आता इतक्या उंचीवर बसून चहाचा आस्वाद घेऊ शकता आणि तेही रोख पैसे देण्याची चिंता न करता.
- आता या दुकानात कोणत्याही अडचणीशिवाय यूपीआय पेमेंट करता येईल.
ट्विटरवर, एका यूजरने देशातील दोन्ही शेवटची चहाची दुकाने शेअर केली, ज्यामध्ये ‘देश की आखरी चाय दुकन’ असे लिहिले होते. हे दुकान समुद्रसपाटीपासून १० हजार ५०० फूट उंचीवर आहे. या दुकानाबाहेरील काउंटरवर यूपीआय बारकोड दिसत आहे. ही पोस्ट पाहून आनंद महिंद्रा खूप खूश झाले आणि त्यांनी ते फोटो आपल्या अकाउंटवर शेअर केले. शेअर करताना, त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
देशातील शेवटच्या चहाच्या दुकानाचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, “हा फोटो भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमची व्याप्ती आणि स्केल दर्शवते. ही पोस्ट लिहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी शेवटी ‘जय हो’ लिहिले.”