मुक्तपीठ टीम
ICC T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सनं पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमवर जोरदार टीका होत आहे.आता दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट टीमच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत संताप व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेट टीमकडून खेळताना प्रत्येक वेळी वर्कलोडची चर्चा होते, हा वर्कलोड आयपीएलदरम्यान का होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
गावस्कर म्हणाले, ‘टीममध्ये बदल होतील, जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही, तेव्हा बदल होतील. न्यूझीलंडला जाणाऱ्या संघात बदल झाल्याचे समजले आहे. वर्कलोड-वर्कलोड मॅनेजमेंटची जी चर्चा सुरू आहे, कीर्ती आणि मदनने अगदी बरोबर सांगितले की हे फक्त भारतासाठी खेळण्याच्या नावाखाली होते.
त्यावेळी वर्कलोड होत नाही?
ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही आयपीएल खेळता, तुम्ही संपूर्ण सीझन खेळता, तुम्ही त्यासाठी प्रवासही करता.
यापूर्वीचा आयपीएल सीजन केवळ चार मैदानांवर झाला. परंतु बाकीसाठी तर तुम्हाला प्रवास करावाच लागतो. त्यावेळी वर्कलोड होत नाही?
केवळ भारतासाठी खेळायचं असेल तरच वर्कलोड होतो.
तोही तेव्हा जेव्हा तुम्ही नॉन ग्लॅमरस देशांच्या दौऱ्यावर जाता. तेव्हाच तुम्हाला वर्कलोड जाणवतो? असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं.