मुक्तपीठ टीम
दिल्लीत नुकतीच एक खळबळजनक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी एका क्रिकेटरसोबत घडलेल्या हनीट्र्रॅपिंग प्रकरणाचा शोध घेतला आहे. दिल्लीस्थित क्रिकेटपटूला हनी ट्रॅपिंग, खंडणी आणि ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्रिकेटपटूची प्रतिष्ठा लक्षात घेऊन पोलिसांनी त्याचे नाव उघड केलेले नाही. यासोबतच ऋषभ चंदा, सुभोनकर विश्वास आणि शिव सिंह या तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
हनी ट्रॅपिंग रॅकेटचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीतील एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने डेटिंग अॅपद्वारे महिलेशी संपर्क साधला होता आणि सेक्ससाठी हॉटेलमध्ये भेटही केली होती. हनी ट्रॅपिंग रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
क्रिकेटपटूला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा कट!
- मिळालेल्या माहितीनुसार, हा क्रिकेटर ऑक्टोबरमध्ये काही सामने खेळण्यासाठी दिल्लीहून कोलकाता येथे गेला होता आणि त्यादरम्यान सॉल्ट लेक परिसरातील एका पॉश हॉटेलमध्ये क्रिकेटपटूची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
- या ठिकाणी डेटिंग अॅपद्वारे तो आरोपी महिलेच्या संपर्कात आला आणि हॉटेलमधील महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले.
- यादरम्यान क्रिकेटपटूचे काही व्हिडीओ आणि फोटोही काढण्यात आले आणि त्या आधारे चार आरोपी क्रिकेटपटूला ब्लॅकमेल करत मोठ्या रकमेची मागणी करत होते.
ब्लॅकमेलिंग केल्यामुळे क्रिकेटपटूने आरोपींच्या खात्यात पैसे जमा केले…
- आपली सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी क्रिकेटपटूने नेट बँकिंगद्वारे ६० हजार रुपये चारही आरोपींनी दिलेल्या खात्यात ट्रान्सफर केले आणि सोन्याची चेन आणि मौल्यवान मोबाईल फोन दिला.
- यानंतर क्रिकेटरला सतत ब्लॅकमेल केले जात होते.
- अखेर त्यांने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर बागुआटी परिसरातून तीन आरोपींना अटक केली, तर चौथा आरोपी फरार आहे.