Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोचं वेगवान काम! महागृहनिर्माण योजनेतील ७०० स्लॅब्सचं काम ५५५ दिवसांत पूर्ण!!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

मुंबईतील तळोजा नोडमधील सेक्टर-२८,२९,३१ व ३७ मध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींमधील ५०० स्लॅबचे काम ४८९ दिवसांत पूर्ण केल्यानंतर, सिडको महामंडळाने पुन्हा एकदा डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली याच इमारतींमधील ७०० स्लॅबचे काम केवळ ५५५ दिवसांत पूर्ण करून गृहनिर्माण क्षेत्रातील आपल्याच यशाची पुनरावृत्ती केली आहे.

cidco

“परवडणाऱ्या दरातील घरांचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. यासाठी गुणवत्तेशी कोणतेही तडजोड न करता, घरांचे बांधकाम वेगाने पार पाडण्याकरिता बांधकाम क्षेत्रातील प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर सिडकोचा भर आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्नही वेळेत पूर्ण होणार आहे.” डॉ. संजय मुखर्जी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सिडकोतर्फे नवी मुंबईतील विविध नोडमध्ये ६७ हजार घरांच्या (सदनिका) बांधणीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने सिडकोची वेगाने वाटचाल सुरू आहे. परिहवन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित या गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम रेल्वे स्थानक फोरकोर्ट, बस व ट्रक टर्मिनल परिसरात करण्यात येत आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होण्यासह सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासही प्रोत्साहन मिळणार आहे.

cidco

महागृहनिर्माण योजने अंतर्गत तळोजा नोडमधील सेक्टर-२८,२९,३१ व ३७ मध्ये विकसित करण्यात येत असलेल्या इमारतींमधील ७०० स्लॅबचे काम केवळ ५५५ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. दिवसाला सरासरी १.२६ स्लॅब या विक्रमी वेगाने हे काम पूर्ण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने ही कामगिरी पार पाडली आहे. सिडकोतील नियोजनकार व अभियंते, प्रकल्प सल्लागार टीसीई-एचएसए, एएचसी, कंत्राटदार बीजीएस ॲन्ड कं. यांनी डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली आहे.

या कामगिरीद्वारे सिडकोने गृहनिर्माणातील आपल्या यशाची पुनरावृत्ती केली आहे. सिडकोचे हे यश परवडणाऱ्या दरातील घरांच्या क्षेत्रातील एक सकारात्मक घडामोड आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या परवडणाऱ्या दरातील घरांचे स्वप्न कमी कालावधीत पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले हे आशादायी पाऊल आहे.

 

 


Tags: CIDCOCIDCO Mahagrihnirman Yojanagood newsmuktpeethSlabs Workचांगली बातमीतळोजामुक्तपीठसिडकोसिडको महागृहनिर्माण योजनास्लॅब्स काम
Previous Post

मुकेश अंबानीची मोठी झेप! ‘या’ जर्मन कंपनीशी ४ हजार कोटींचा खरेदी करार!

Next Post

आयआरसीटीसीचे डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म आहे तरी काय? जाणून घ्या कसे करायचे सेट…

Next Post
IRCTC

आयआरसीटीसीचे डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म आहे तरी काय? जाणून घ्या कसे करायचे सेट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!