मुक्तपीठ टीम
चीनच्या काही विचित्र प्रकरणांमुळे आणि आगळ्या-वेगळ्या योजनांमुळे लोक नेहमीच चिंतेत पडतात. काहीवेळेस अडचणीतही येतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील त्यांच्या योजना आणि धोरणांमुळे त्यांच्याच देशात लक्ष्य आहेत. आता चीन नवीन योजना आखत आहे जे ऐकूण सर्वांनाच आश्चार्य वाटेल. चीनची नवीन योजना ही त्यांच्या तियांगोंग स्पेस स्टेशनवर माकडे पाठवण्याची आहे.
या योजनेमागील चीनचे धोरण म्हणजे, शून्य-गुरुत्वाकर्षण वातावरणात माकडांची वाढ कशा प्रकारे होते, ते कसे प्रजनन करतात हे जाणून घेणे आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने, स्पेस स्टेशनसाठी वैज्ञानिक उपकरणांचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ झांग लू यांचा हवाला देत अहवाल दिला की, हे संशोधन स्पेस स्टेशनच्या सर्वात मोठ्या मॉड्यूलमध्ये केले जाईल, ज्याचा वापर जीवन विज्ञान प्रयोगांसाठी केला जाईल.
अंतराळ वातावरणात जीवसृष्टीबाबत माहिती मिळवण्यासाठी माकडांना अंतराळ स्थानकावर पाठवणार!
- बीजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे संशोधक डॉ. लू यांनी एका भाषणात सांगितले की, “हे प्रयोग सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि अंतराळ वातावरणात जीवसृष्टीबाबत माहिती समजून घेण्यास मदत करेल.”
- शास्त्रज्ञांनी सांगितले की उंदीर आणि प्राइमेट्ससारख्या अधिक जीवन प्रकारांवर संशोधन करणे आव्हानात्मक आहे.
- त्यामुळे माकडांवर हा प्रयोग करण्यात येईल.