मुक्तपीठ टीम
सध्याचं २०२२ हे वर्ष मुंबईतील बांधकाम उद्योगासाठी चांगलं वर्ष ठरत आहे. कोरोना महामारीमुळे थंडावलेल्या मालमता खरेदी-विक्री व्यवहारांना या वर्षी गती मिळाली आहे. मुंबईत दिवसेंदिवस घरांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. मुंबई मनपाच्या हद्दीत नवीन घरांच्या नोंदणीमध्ये वाढ झाली असून तिने १ लाखांचा टप्पाही ओलांडला आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये, मालमत्ता/ घरांचे ८ हजार २७६ विक्री व्यवहार नोंदवण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारला ७०५ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. तो गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर २०२१मधील महसुलाच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी जास्त आहे.
खरेदी-विक्रीला चांगला वेग!
- जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत स्थावर मालमत्तेची गेल्या १० वर्षांत सर्वाधिक विक्री झाली.
- या वर्षी प्रथमच वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत, मुंबईतील रिअल इस्टेट विक्री नोंदणीने १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या १० वर्षांमधील ‘ही’ दुसरी सर्वोत्तम विक्री!
- मुंबईतील अर्थकारणात बांधकाम क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे.
- मुंबईतील जागांच्या मग त्या निवासी असो वा व्यावसायिक देशात सर्वात जास्त असतात.
- यावेळी ऑक्टोबरमध्ये म्हणजेच दिवाळीच्या दिवसांत २०२० नंतर १० वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम विक्री झाली.
- २०२०मध्ये नोंदणी करणाऱ्यांना दिवाळीनंतर मुद्रांक शुल्कात कपातीचा फायदा झाला होता.