मुक्तपीठ टीम
अक्रोड हे अत्यंत पौष्टिक ड्राय फ्रूट आहे. हे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण अक्रोड भिजवून त्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कच्च्या अक्रोडांपेक्षा भिजवलेले अक्रोड जास्त फायदेशीर आहे.
अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्यातील सत्व आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे.
भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
- भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण, अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते.
- ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स पोटात असलेल्या बाळाच्या मेंदूच्या विकासात मदत करतात.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने अक्रोडाचे सेवन करणे आई आणि पोटात असलेले बाळ दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते.
रक्तातील साखर नियंत्रित होते
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.
- अक्रोडच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. इतकेच नाही तर तुम्हाला मधुमेह नसेल तरी त्याचे सेवन केल्याने टाइप-२ मधुमेह होण्याचा धोकाही कमी होतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
- हृदय निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
- अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयासाठी फायदेशीर असते.
- ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करतात, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.
पचन सुधारण्यासाठी फायदेशीर
- भिजवलेले अक्रोड खाणे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
- अक्रोडमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे योग्य पचन राखण्यास मदत करते.
- याचे रोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पोटही बरोबर राहील.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
- रोज अक्रोड खात असाल तर त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
- यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.