मुक्तपीठ टीम
गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. येत्या १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर निकाल ८ डिसेंबरला हिमाचल निवडणुकांसोबत जाहीर होणार आहेत. यावेळी गुजरात निवडणुकीत ४.९ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यावेळी ३.२४ लाख मतदारांना प्रथमच मतदानाची संधी मिळणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
असा असणार निवडणुकीचा कार्यक्रम
टप्पा- १: ८९ जागा |
कार्यक्रम |
टप्पा- २: ९३ जागा |
५ नोव्हेंबर | अधिसूचना | १० नोव्हेंबर |
१४ नोव्हेंबर | नावनोंदणीची शेवटची तारीख | १७ नोव्हेंबर |
१५ नोव्हेंबर | उमेदवारी अर्जांची तपासणी | १८ नोव्हेंबर |
१७ नोव्हेंबर | उमेदवारी मागे घेणे | २१ नोव्हेंबर |
१ नोव्हेंबर | मतदान | ५ नोव्हेंबर |
गुजरात विधानसभा निवडणुक दोन टप्प्यात!
- गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
- पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर १ डिसेंबरला मतदान होणार आहे.
- दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर ५ डिसेंबरला मतदान होणार आहे.
- निकाल ८ डिसेंबरला होणार जाहीर.
- गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण १८२ जागा आहेत.
- बहुमतासाठी ९२ जागांची गरज आहे.
- २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ९९ तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या.
- ६ जागा अपक्ष आणि इतरांना गेल्या.
- मध्य गुजरातमध्ये ६८, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ जागा आहेत.
३.२४ लाख मतदारांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क…
- गुजरात निवडणुकीत ३.२४ लाख मतदारांना पहिल्यांदा मतदानाची संधी मिळणार आहे.
- या निवडणुकीत दिव्यांगांसाठी १८२ मतदान केंद्रे उभारली जाणार आहे.
- या निवडणुकीत ४.९ कोटी मतदार आहेत.
- एकूण मतदान केंद्रांची संख्या ५१ हजारांहून अधिक आहे.
भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये होणार लढत!
- गेल्या २४ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता आहे.
- यावेळी समीकरणे बदलताना दिसत आहेत.
- दिल्ली आणि पंजाब जिंकल्यानंतर गुजरातमध्येही आम आदमी पक्षाने पूर्ण तयारीत आहे.
- अशा स्थितीत स्पर्धा तिरंगी होऊ शकते.