मुक्तपीठ टीम
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेत लोक मोठ्या उत्साहात सामिल होत आहेत. ७ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मेहुणे आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी शिर्डी येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भाष्य केलं. शिर्डीत प्रसिद्ध साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते तेव्हा वाड्रा म्हणाले की, राहुल गांधींची विचारसरणी साईबाबांसरखीच आहे. त्यांनी एकात्मतेचा विचार मांडला आहे.
मंदिरात पूजा करता आली त्याबद्दल आनंद व्यक्त करत रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, साईबाबांनी एकतेचा संदेश दिला आहे. “सध्या आपला देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. राहुल गांधी यांची विचारसरणी साईबाबांसारखीच एकतेची आहे. त्यांना लोकांचे आशीर्वाद मिळतील अशी आशा आहे.”
राहुल गांधी जनतेसाठी नवी आशा – रॉबर्ट वाड्रा
- राहुल गांधी अनेक ठिकाणी जात आहेत आणि हजारो लोकांना भेटत आहेत.
- लोक त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने सामील होत आहेत.
- भविष्यात बदल घडून येईल कारण राहुल गांधी ही नवी आशा आहे.
- सरकार आमच्या अपयशाबद्दल बोलतात, ते पक्षाची चेष्टाही करतील, पण राहुल, प्रियांका थांबणार नाहीत.
- काँग्रेस लोकांमध्ये आहे आणि राहणार.
- गांधी घराण्याला लोकांचे अपार प्रेम मिळत होते.
- काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करतील.
- ज्यांना सोडायचे आहे ते जाऊ शकतात, परंतु जे राहतील त्यांना सोनिया गांधींचे बलिदान आणि राहुल आणि प्रियंका यांचे प्रयत्न समजतील.
- काँग्रेससाठी आम्ही एकजुटीने काम करू, असे ते म्हणाले.