मुक्तपीठ टीम
भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने शनिवारी केलेली बीएसई फाइलिंग महत्वाची माहिती उघड करणारी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान तयार करण्यात आलेल्या काही कार परत मागवल्या आहेत. जर तुम्ही सुद्धा या कालावधीत मारुती सुझुकीची कार विकत घेतली असेल तर तुम्ही स्वत: तपासा.
- मारुती सुझुकीला शंका आहे की मागील ब्रेक असेंबली पिनमध्ये दोष आहे, ज्यामुळे प्रवास करताना खूप आवाज येतो.
- या खराबीमुळे दीर्घ कालावधीत ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निसच्या ९,९२५ गाड्या परत मागवल्या आहेत.
- ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान तयार करण्यात आलेल्या अशा कार चाचणीसाठी कंपनीने परत मागवल्या आहेत.
कार रिकॉलसाठी कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क करणार…
- मारुती सुझुकी कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधेल ज्यांच्या कारमध्ये बिघाड आहे.
- कंपनीने शुक्रवारी सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र निव्वळ नफा जाहीर केला.
- कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा चार पटीने वाढून २,०६२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- या तिमाहीत कंपनीचा महसूल ४६ टक्क्यांनी वाढून २९,९३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- या तिमाहीत विक्रीचे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढून ५१७,३९५ युनिट्सवर पोहोचले आहे.