Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आकाशात उडत्या ट्रेनसारख्या भासणाऱ्या ‘त्या’ प्रकाशरेषा कसल्या?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Starlink Light

मुक्तपीठ टीम

देशातीलच नाही तर जगभरातील अनेक ठिकाणी आकाशात ट्रेनसारख्या प्रकाशरेषा दिसल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. समाजमाध्यमांमध्ये तसे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. दिवाळी असल्याने फटाक्यांवरही संशय गेला. परंतु हे दिवाळीच्या रॉकेट किंवा फटाक्यांमुळे दिसले असे नाही त्यामागचे कारण ही वेगळंच आहे, चला जाणून घेवुया काय आहे कारण?

गेल्या काही दिवसांत लोकांनी आकाशात एक रहस्यमय दृश्य पाहिले आहे. देशभरात अनेक ठिकाणी रात्रीच्या अंधारात आकाशात एका सरळ रेषेत लांबलचक रांग लोकांना दिसली. ते बघून जणू एखादी ट्रेन आकाशात उडतेय असे वाटले.

 

Saw this unidentified object in the night sky pic.twitter.com/mpq3qw1Uyr

— Raj Lakshmi Yadav راج لکشمی (@Rajlakshmiyadav) September 12, 2022

उडणाऱ्या ट्रेनसारख्या प्रकाशरेषेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल…

  • आकाशात उडणाऱ्या ट्रेनसारख्या या विचित्र प्रकाशाबद्दल विविध अंदाज बांधले जात आहे.
  • हा विचित्र प्रकाश काही काळ दिसल्यानंतर आकाशातून गायब होतो.
  • अनेकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ बनवले आणि ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • काहींनी त्याला एलियन यूएफओ म्हणायला सुरुवात केली तर काहींनी फ्लाइंग सॉसर म्हणायला सुरुवात केली आहे.
  • हे स्पष्ट झाले की हा विचित्र प्रकाश नसून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक उपग्रहाचा परिणाम होता.

या प्रकाशाचे रहस्य काय आहे?

  • या वर्षाच्या सुरुवातीला पंजाबमध्येही असा प्रकाश दिसला होता.
  • जम्मू पोलिसांनी याला स्टारलिंक उपग्रहाचा प्रकाश म्हणून वर्णन केले होते.
  • आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्समध्येही, हे छायाचित्रे स्टारलिंक सॅटेलाइट असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • इतरही काही ठिकाणी असा प्रकाश दिसेल अशी माहिती देण्यात आली आहे.
  • स्टारलिंक ही एलोन मस्कची कंपनी आहे.
  • जगभरात सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा पुरवते.
  • या कामासाठी त्यांनी अनेक उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.
  • भविष्यात आणखी अनेक उपग्रह पाठवणार आहेत.

Tags: elon muskStarlinkStarlink Satellite LightTeslaTrain Like light in sky
Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर: “घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही!”

Next Post

हिमाचलमधून ‘आमदार’ होण्यासाठी निवडणूक लढणार कंगना रनौत?

Next Post
kangana Ranaut

हिमाचलमधून 'आमदार' होण्यासाठी निवडणूक लढणार कंगना रनौत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!