मुक्तपीठ टीम
‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सरकारने काहीच केले नाही, असा आरोप राज्य सरकारवर केला. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही!
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
- यावेळी बोलताना, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा नैतीक अधिकार कुणाला नाही.
- हे बहुमतातलं सरकार आहे.
- १७० आमदारांचं आम्हाला पाठबळ आहे.
- सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय प्रलंबित आहे.
- हे सरकार लोकशाही पद्धतीनं स्थापन झाले आहे.
- ज्या सरकारकडं बहुमत असतं ते सरकार कायदेशीर असतं.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
- ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
- राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र घटनाबाह्य सरकारने काहीच केले नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केले आहे.
- डबल इंजिनचं सरकार नीट सुरू होतं. कदाचित घटनाबाह्य सरकार आल्याने हे इंजिन फेल गेलं आहे.
- महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती.
- ती इतर राज्यात गेली आहे.
- कदाचित इतर राज्यात निवडणुकीसाठी ही गुंतवणूक गेली असेल.
- तिकडे अजून काही चांगलं द्यायचं असेल.