मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात उंच भगवान शंकराच्या मुर्तीचे काम पूर्ण झाले आहे. ही मुर्ती चक्क ३६९ फुट उंचीची आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी सुरू झाला आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे बांधण्यात आलेल्या मुर्तीला “विश्वास स्वरूपम” असे नाव देण्यात आले आहे. हा लोकार्पण सोहळा २९ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.
मूर्ती तयार होण्यासाठी १० वर्षे लागली!
- नाथद्वाराच्या गणेश टेकरीवर बांधलेली ही मूर्ती बांधलेली आहे.
- या मूर्तीचे काम पूर्ण होण्यासाठी १० वर्षे लागली.
- या मूर्तीमध्ये भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसत आहेत.
- अहवालानुसार, २०१२मध्ये जेव्हा हा पुतळा बनवण्याची योजना तयार करण्यात आली होती, तेव्हा त्याची उंची २५१ फूट ठेवण्याची योजना होती.
- पण नंतर बांधकामादरम्यान त्याची उंची ३५१ फूट झाली.
- यानंतर शिवाच्या केसात गंगेचा प्रवाह टाकण्याची योजना आखण्यात आली, त्यानंतर त्याची उंची ३६९फूट झाली.
संत कृपा सनातन संस्थानद्वारे मुर्ती साकारली!!
- या पुतळ्यामध्ये लिफ्ट, जिने, हॉल आदी सुविधाही करण्यात आल्या आहेत.
- बांधकामादरम्यान ३०००टन स्टील आणि लोखंड, २.५ लाख घन टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे.
- २५०किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचाही पुतळ्यावर परिणाम होणार नाही.
- संत कृपा सनातन संस्थान द्वारे या भगवान शंकराची ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.
जगातील ५ सर्वात उंच शिवमूर्ती…
- विश्वास स्वरूपम, राजस्थान – ३६९ फूट
- कैलाशनाथ महादेव मंदिर, नेपाळ – १४३ मीटर
- मरुडेश्वर मंदिर, कर्नाटक – १२३ मीटर
- आदियोग मंदिर, तामिळनाडू -११२ मीटर
- मंगल महादेव, मॉरिशस -१०८ मीटर