मुक्तपीठ टीम
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या मागणीमुळे नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो चर्चेत आला आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, महात्मा गांधींचा फोटो भारताच्या चलनी नोटेवर पहिल्यांदा कधी छापण्यात आला? महात्मा गांधींचा नोटेवरील हा फोटो कोणी? कधी? आणि कसा काढला होता? जाणून घ्या भारतीय चलनाशी संबंधित काही मनोरंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी…
भारतीय चलनी नोटांवर पहिल्यांदा गांधींचा फोटो कधी छापण्यात आला?
- भारतीय चलनावर सुरुवातीपासूनच नोटांवर गांधीजींचा फोटो नव्हता.
- महात्मा गांधींच्या १०० व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने १९६९ मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला.
- यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.
- महात्मा गांधीचा सध्या चलनी नोटांवर दिसणारा फोटो १९४६ साली काढण्यात आला होता.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महात्मा गांधींचा फोटो असणारी पहिली नोट म्हणून १०० रुपयांची नोट छापली.
- नोटांवर दिसणारी गांधीजींची मुद्रा आहे ती सर्वात आधी ५०० रुपयांच्या नोटांवर ऑक्टोबर १९८७ रोजी छापण्यात आली.
- १९९६ साली महात्मा गांधीचा फोटो असणाऱ्या ५,१०,२०,१००,५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनात आल्या.
जाणून घ्या भारतीय चलनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी…
- सध्या भारतात १० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहे.
- पण भारतात स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९४९ मध्ये पहिल्यांदा १ रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होत्या.
- सध्याच्या १० रुपयांच्या नोटेवर कोणार्क सूर्य मंदिर या ऐतिहासिक ठिकाणाचा फोटो आहे.
- देशात नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी या ठिकाणी नोटा छापल्या जातात.
- बँक नोटेच्या लँग्वेज पॅनेलमध्ये नोटेची किंमत १५ भाषांमध्ये लिहिली आहे?
- आरबीआय ने छापलेली सर्वात जास्त मूल्याची नोट ही १० हजारची आहे?
- जुन्या १०० रुपयांच्या नोटेचा आकार १५७ x ७३ मिमी इतका होता.
- १९५३ पासून हिंदीमध्ये नोटांवर मजकूर छापण्यास सुरुवात झाली.
- १९८० साली नोटा छापण्यासाठी नवीन सेट तयार करण्यात आले. तेच आता वापरले जातात.