मुक्तपीठ टीम
आतापर्यंत फक्त सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन होता पण आता विवो देखील फोल्डेबल फोन घेऊन आला आहे. विवोने त्यांचा नवीन फोल्डेबल फ्लॅगशिप फोन Vivo X Fold बाजारात लाँच केला आहे. आता फोल्डेबल फोनसाठी बाजारात स्पर्धा होणार आहे. चला जाणून घेऊया फोनच्या इतर फीचर्सबद्दल…
विवो एक्स फोल्डचे खास फिचर्स…
- यात स्नॅपड्रॅगन ८+ जनरेशन१ प्रोसेसर देण्यात आला आहे.
- विवो एक्स फोल्डमध्ये ८.०३ -इंच फ्रंट स्क्रीन आणि ६.५३-इंचाची सेकंडरि स्क्रीन आहे.
- फोनसोबत ८० वॉल्ट वायर चार्जिंग आणि ५० वॉल्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
- विवो एक्स फोल्ड ब्लॅक, ब्लू आणि रेड या रंगामध्ये उपलब्ध आहे.
- फोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे.
- विवो एक्स फोल्डच्या २५६ जीबी स्टोरेजसह १२ जीबी रॅमची किंमत १,१५,००० रुपये आणि ५१२ जीबी स्टोरेजसह १२ जीबी रॅमची किंमत १,२५,००० रुपये आहे.
विवो एक्स फोल्ड डिझाइन आणि स्पेसीफीकेशन
- विवो एक्स फोल्डला आलिशान आणि प्रीमियम डिझाइनसह सादर करण्यात आले आहे.
- विवो एक्स फोल्डमध्ये ८.०३ -इंचाचा प्रायमरी एमोलीड डिस्प्ले आहे.
- डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०एच झेड आहे.
- दुसरा डिस्प्ले ६.५३-इंचाचा एमोलीड आहे.
- फोनमध्ये अॅड्रेनो ७३० ग्राफिक्स सपोर्ट आहे.
- विवो एक्स फोल्डमध्ये १२ जीबी LPDDR5 रॅमसह ५१२ जीबीपर्यंत UFS ३.१ स्टोरेज आहे.
विवो एक्स फोल्डचे बॅटरी तपशील…
- विवो एक्स फोल्डमध्ये ४७३० एम ए एच बॅटरी आहे.
- ही बॅटरी ८० वॉल्ट वायर्ड आणि ५० वॉल्ट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.
- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल 5G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ v5.2 आणि NFC सपोर्ट आहे.
- सेफटीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे.
- विवो एक्स फोल्डचे एकूण वजन ३११ ग्रॅम आहे.
विवो एक्स फोल्डचे कॅमेरा फिचर्स…
- विवो एक्स फोल्डमध्ये चार रियर कॅमेरे आहेत.
- Zeiss ब्रँडिंग देखील कॅमेरासह उपलब्ध आहे.
- फोन f/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह येतो.
- प्रायमरी कॅमेरासह OIS चं समर्थन आहे.
- सेकंडरी लेन्स ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल f/2.2 अपर्चर आहे.
- थर्ड लेन्स १२ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहे.
- चौथी लेन्स ८ मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स आहे.
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये १६-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे, जो ८के व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.