मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित एका विशेष डिनरमध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते आशिष शेलार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शिंदेंनी पवार माझ्या व भाजपा नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांची रात्रीची झोप उडेल, अशी मिश्किल टिपणी केली.
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!!
- एकनाथ शिंदेंनी यावेळी कुणाचेही नाव घेतले नाही.
- पण त्याचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे होता.
- शिंदे म्हणाले – ‘पवार, फडणवीस व शेलार एकाच व्यासपीठावर आलेत.
- यामुळे काही लोकांची रात्रीची झोप उडू शकते.
- पण ही राजकारण करण्याची जागा नाही.
- आम्ही सर्वजण खेळांचे प्रशंसक व समर्थक आहोत.
- त्यामुळे आम्ही आपसातील राजकीय मतभेद विसरुन खेळाच्या विकासासाठी एकत्र आलोत.’
पवार, शिंदे आणि फडणवीस यांची भेट अत्यंत महत्त्वाची!!
- सध्या पवार, शिंदे आणि फडणवीस यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
- एमसीए ही अत्यंत प्रतिष्ठित संघटना आहे.
- शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप पाटील यांच्या विरोधात एमसीएचे पुढील अध्यक्ष म्हणून त्यांचे उमेदवार अमोल काळे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी भेट घेतली.
- मात्र, कोणत्याही नेत्याकडून अधिकृत वक्तव्य आलेले नाही.