मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी एकाच मंचावर एकत्र आले. या नेत्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन पोलीस संरक्षणासाठीचे १० कोटी पोलीस विभागाला देणे लागते. तो पोलीस संरक्षण खर्च माफ करण्याची शरद पवार आणि आशिष शेलारांची मागणी गृहखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ मान्य केली! त्यामुळे टीका सुरु झाली आहे. शिक्षक, आरोग्यसेवक, कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका अशा अनेकांच्या मागण्या प्रलंबित असताना क्रिकेटसारख्या श्रीमंत खेळाच्या संघटनेला पोलीस बिल माफ करण्याची गरज होती का, असा प्रश्न विचारला जात आहे.
वानखेडे स्टेडियमच्या जागेची लीज वाढवणे, पोलीस सुरक्षेसाठी आकारण्यात आलेली रक्कम माफ करणे या असोसिएशनच्या मागण्या नक्की पूर्ण केल्या जातील असेही याप्रसंगी स्पष्ट केले. पनवेल जवळील डोलघर येथील ५१हेक्टरचे मैदान एमसीए ला देण्याचा विषयही शासनाच्या विचाराधीन असल्याचेही स्पष्ट केले.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 19, 2022
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे १० कोटी पोलीस संरक्षण बिल माफ!
- मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई पोलिसांनी पुरवलेल्या संरक्षणाचे १० कोटी रुपये देणे आहे.
- सातत्यानं मागणी करूनही ते भरले जात नाहीत.
- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सत्तेसाठी भाजपा, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट एकत्र आलेत.
- त्यानमित्त एका प्रचारसभेत हे सर्व नेते एकाच मंचावर एकत्र आले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर बुधवारी प्रचारासाठी एकत्र आले.
- पवार आणि शेलार यांनी केलेल्या विनंतीनंतर गृहखातं सांभाळणाऱ्या फडणवीस यांनी एमसीएने पोलीस खात्याचे सुमारे १० कोटी रुपये संरक्षण बिल माफ करण्याचं आश्वासन दिले.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विटरवर या निर्णयांची माहिती दिली.
शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. मोठा निर्णय झाल्याचं वाचलं. ‘दारिद्र्यरेषे’खालील मुंबई क्रिकेट असोसिएशनचा १० कोटींचा पोलीस संरक्षण खर्च माफ झाला. पवार-शेलारांची मागणी लगेच फडणवीसांनी मान्य केली! सामान्यांच्या ‘फालतू’ मागण्यांसाठी थोडी असं एकत्र यायचं असतं! pic.twitter.com/cDo1L1CgWo
— Tulsidas Bhoite 🌸 O+ (@TulsidasBhoite) October 20, 2022
शिंदे-फडणवीस सरकारचे पवारांना आश्वासनं!
- वानखेडे स्टेडियमचे २०१८ पासून नूतनीकरण प्रलंबित असलेले भाडेपट्टी एका महिन्यात नवीन करण्यात येईल, असे आश्वासनही शिंदे आणि फडणवीस यांनी पवारांना दिले.
- शिंदे-फडणवीस सरकार नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेजवळील डोलघर या गावात १२५ एकर जागा अत्याधुनिक क्रीडा संकुलासाठी देणार आहे.
- एमसीएला ठाणे-घोडबंदर येथे मनोरंजनात्मक क्रिकेट संकुलासाठी २२ एकर जागा मिळणार आहे.
- यावेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
- आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, अमोल काळे, प्रताप सरनाईक यांचीही उपस्थिती होती.