भारतीय रेल्वेने वंदे भारतनंतर आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. वजनाने हलकी आणि अधिक मालवाहतुकीची क्षमता असणाऱ्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अॅल्युमिनियम फ्रेट रेकचा समावेश भारतीय रेल्वेने केला आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथून या मालगाडीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. रेल्वेने सांगितले की, बेस्को लिमिटेड वॅगन विभाग आणि अॅल्युमिनियम क्षेत्रातील प्रमुख हिंदाल्को यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादित वॅगनचे वजन कमी करण्यासाठी प्रति क्विंटल कार्बन फूटप्रिंट देखील कमी आहे.