Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बार्शी येथील ७२ वर्षाचे लतिफ बागवान निघाले ‘भारत जोडो’ यात्रेला

October 18, 2022
in घडलं-बिघडलं
0
Yatra photo 1

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पांगरी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील ७२ वर्ष वय असलेले लतिफ शक्करजी बागवान हे स्वयंस्फुर्तीने निघाले आहेत. ते उद्यापासून कर्नुल (आंध्र प्रदेश) येथून यात्रेत सहभागी होणार असून आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने माजी राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे , प्रदेश सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लतिफ बागवान व्यवसायाने टेम्पो ड्रायव्हर आहेत. साधारण १९७५ पासून ते काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. इंदिरा गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव असून इंदिरा गांधी यांच्याशी ते पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना लिहिलेली पत्रे त्यांनी आजही जतन करून ठेवली आहे. लतिफ बागवान हे आंध्र प्रदेशातील कर्नुल येथून यात्रेत सहभागी होत असून तेथून पुढे आलुरु, मंत्रालयम, अडोनी, रायचुर आदी ठिकाणी होणाऱ्या यात्रेत ते पायी चालत सहभागी होणार आहेत. दिवाळीपर्यंत साधारण ८ दिवस ते या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या यात्रेमध्येही पायी चालत सहभागी होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, ७२ व्या वयामध्येही भारत जोडो यात्रेमध्ये स्वयंस्फुर्तीने चालत सहभागी होण्याचा लतिफ बागवान यांचा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे. भारत जोडो यात्रेसमवेत सर्वस्तरातील लोक जुळत आहेत. यातून भावी काळामध्ये परिवर्तन अटळ आहे. लहान, थोर, ज्येष्ठ अशा सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा पाहून आमचाही उत्साह वाढला आहे. महाराष्ट्रामध्येही भारत जोडो यात्रा सर्वांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. लतिफ बागवान यांना यात्रेसाठी शुभेच्छा देतो, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही देशाची लोकशाही वाचविण्यासाठी अत्यंत आवश्यक असून त्यात सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन लतिफ बागवान यांनी यावेळी केले.


Tags: barshiBharat Jodo YatraCongressLaftif BagwanMaharashtraकाँग्रेसबार्शीभारत जोडो यात्रालतिफ बागवान
Previous Post

भारतीय रेल्वेची पहिली स्वदेशी अॅल्युमिनियम फ्राइट रॅक!

Next Post

महाराष्ट्रात १००४ ठिकाणी अपघात घडणारे ब्लॅक स्पॉट, अपघाताचे प्रमाण ५३%! ७२% अपघात अतिवेगाने!!

Next Post
black spot

महाराष्ट्रात १००४ ठिकाणी अपघात घडणारे ब्लॅक स्पॉट, अपघाताचे प्रमाण ५३%! ७२% अपघात अतिवेगाने!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!