मुक्तपीठ टीम
भारतीय एक्जिम बँकेत म्हणजेच भारतीय निर्यात-आयात बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदावर ४१ जागा, लॉ मॅनेजर या पदावर ०२ जागा, मॅनेजर या पदासाठी ०२ जागा अशा एकूण ४५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 0४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ६०% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए- फायनान्स किंवा सीए
- पद क्र.२- १) एलएलबी २) ०६ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन या विषयात ५०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा पदवीधर + कॉम्प्युटर सायन्स/ ५०% गुणांसह एमसीए २) ०६ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २५ वर्षांपर्यंत तर, पद क्र. २ आणि ३ साठी उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय एक्जिम बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.eximbankindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/iebmtsep22/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1pQiZEK31aJVEcoNPWVCw457p8RtYIOc2/view