मुक्तपीठ टीम
रॉयल एनफील्ड कंपनी लवकरच रॉयल एनफील्ड बुलेट ३५० ही बाईक नवीन अवतारात लाँच करणार आहे. भारतात या बाईकला प्रचंड मागणी आहे. चेन्नईमध्ये या बाइकची चाचणी करण्यात आली. ही बाईक येत्या काही महिन्यांत भारतात रस्त्यावरून धावताना दिसणार आहे. रॉयल एनफिल्डने हंटर ३५० लाँचच्या वेळी या बाईकच्या लाँचबद्दल माहिती दिली होती. ही आगामी बाईक कशी असेल? चला जाणून घेउया…
आगामी नवीन रॉयल एनफील्ड बुलेट ३५० नवीन बाईकमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, सिंगल चॅनल एबीएस, हॅलोजन हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्स, ट्यूब्ड टायर्स आणि स्पोक व्हील सारखे फिचर्स असण्याची शक्यता आहे.
- कंपनीने या बाइकमध्ये ३४९सीसी इंजिन दिले आहे.
- हे इंजिन ऑइल कूल्ड SOHC इंजिन आहे.
- नवीन रॉयल एनफिल्डचे इंजिन २०.२ बीएचपी पॉवर आणि २७एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- ही बाईक ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडली जाऊ शकते.
- कंपनी २०२३ च्या सुरुवातीला ही बाईक लाँच होण्याची शक्यता आहे.