मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे. शिवसेना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणाऱ्या शिंदे गटाला आता युतीतल्या भाजपानेच दुसरा धक्का दिला आहे. अंधेरी मतदारसंघानंतर जव्हार तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायतीतल्या शिंदे गटातील माजी सरपंच, सरपंचपदाचे उमेदवार आणि ११ सदस्यांनी थेट भाजपातच प्रवेश केला आहे.
सरपंच, सरपंचपदाच्या उमेदवारासह सगळं पॅनलचा भाजपामध्ये प्रवेश-
- पालघर जिल्ह्यात ३४२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून रविवारी १६ ऑक्टोबर रोजी मतदान व १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
- जव्हार तालुक्यात ४६ ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असून अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पक्ष संघटनेचा प्रचार जोमाने केला आहे.
- कौलाळे ग्रामपंचायतीत शिंदे गटाला खिंडार पडले असून शिंदे गटातील माजी सरपंच, सरपंच पदाचे उमेदवार व ११ सदस्यांनी थेट भाजपातच प्रवेश केला आहे.
- माजी सरपंच सुभाष मुर्थडे आणि निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पूर्ण पॅनलनेच सरपंच पदाच्या उमेदवार वैशाली धोडी यांच्यासह भाजपा प्रवेश केला.
- जव्हार येथील भाजपाच्या कार्यालयात या सर्वांनी भाजपा प्रवेश केला आहे.
शिंदे गटावर नाराजी!
- ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाच्या संपूर्ण पॅनलनेच भाजपामध्ये प्रवेश करत धक्का तंत्राचा वापर केला आहे. आमच्या काही अपेक्षा शिंदे गटामार्फत पूर्ण झाल्या नाहीत.
- शिवाय आम्ही केलेल्या सूचना देखील मान्य केल्याने आम्ही हा निर्णय घेतला.
- तालुक्यात भाजपा हा प्रथम क्रमांकाचा पक्ष असल्याने संपूर्ण पॅनलसहित प्रवेश केला असल्याचे माजी सरपंच सुभाष मुर्थडे यांनी सांगितले.