मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला देशात सुरुवात होत असताना पंतप्रधानांनी स्वत: लस घेणे हे लसीविषयीचे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते आहे. त्यांनी लसीकरणाच्या छायाचित्रासह ट्विट करत ही माहिती दिली. त्यानंतर भारतातच नाही तर जगभरात त्यांचे लसीकरण चर्चेत आलं.
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. आजपासून देशात करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास एम्स रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला.
Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.
Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.
I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021
नरेंद्र मोदी यांनी छायाचित्रासह ट्विट करत ही माहिती दिली आहे, “मी एम्समध्ये जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात.”
भारत बायोटेकची लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस टोचून घेतली. अंतिम टप्प्याच्या चाचण्या होण्यापूर्वीच या लसीला मान्यता मिळाल्याने कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेतविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.
लसीकरणाचा तिसरा टप्पा
आजपासून देशातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
खासगी रुग्णालयातही २५० रुपयांत कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच यासाठी परवानगी दिली.
जगभरात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर जगभरातील माध्यमांनी त्यांच्या लसीकरणाची दखल घेतली. चीनमधील सरकारी मालकीच्या सीजीटीएनने भारतीय पंतप्रधानांनी लस घेतल्याची बातमी दिली. तसेच जगभरातील इतरही माध्यमांनी जगातील इतर राष्ट्रप्रमुखांच्या लसीकरणाचा उल्लेख करत मोदीही आता त्यांच्यात सहभागी झाल्याचा उल्लेख केला. त्यामुळे सामान्यांमधील लसीबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि तेही लसीकरणाकडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
#BREAKING India Prime Minister Narendra Modi took his first dose of #COVID19 vaccine , according to local media (File photo) pic.twitter.com/yxJD523aB4
— CGTN (@CGTNOfficial) March 1, 2021
लसीकरणातही राजकीय कनेक्शन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाचे राजकीय कनेक्शन सोशल मीडियावर मांडण्यास सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा: पंतप्रधान मोदींनी लस घेताच का झाले ‘कॅमेराजीवी’ टीकेचे साइडइफेक्ट?