Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“…तर मायावती ‘रिपाइं’च्या राष्ट्रीय अध्यक्ष…मी उपाध्यक्ष!” आठवलेंची नवी ऑफर!

March 1, 2021
in सरकारी बातम्या
0
mayawati vs ramdas

मुक्तपीठ टीम

रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे.त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे.बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे.जर मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते लखनौ च्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज लखनौ येथे रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली.

देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली असुन त्या मागणीचा पुनरुच्चर आज लखनौ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केला.

उत्तर प्रदेश सन 2022 च्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजप सोबत युती करेल अशी आज ना रामदास आठवले यांनी घोषणा केली.जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेस मध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेस चे काही भले होणार नाही असा टोला ना रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला.

लखनौ येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास  रामदास आठवले यांनी संबोधित केले. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच या वेळी विधान सभा निहाय पक्ष प्रभारिंची नियुक्ती ना रामदास आठवले यांनी केली.आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा विजयी लहरू द्या असे आवाहन ना रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता; जवाहर; अशोक पांडेय; हेंसू राम; श्याम सुंदर सिंह; जितेंद्र जैसवाल; हेमंत सिंह; जय कुमार पांडे; बलविर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

 


Tags: चंद्रशेखर आझादडॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ.दिनेश शर्मारामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष
Previous Post

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात माजी सैनिकांसाठी मेगा भरती

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस, लोकल टू ग्लोबल चर्चा!

Next Post
narendra modi vaccine

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस, लोकल टू ग्लोबल चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!