मुक्तपीठ टीम
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेच्या युतीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजपाला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे नको होते, त्याच पध्दतीनं एकनाथ शिंदेसुद्धा त्यांना नको असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
- सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही.
- ही काही गादीची लढाई नाही.
- मतदार हा राजा आहे.
- त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल.
- तो निर्णय आनंदानं स्विकारावा असेही आंबेडकर म्हणाले.
- ज्याप्रमाणे भाजपाला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत.
- हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे.
- त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणुकीत आमची वेट आणि वॉचच्या भूमिका!!
- अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात ते म्हणाले की, या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत.
- ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे.
- या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही.
- आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नाही.
- सर्वोच्च न्यायालयाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत.
- त्याचं काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती.
युतीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांचं महत्वाचं विधान-
- युतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पहिलं प्राध्यान कोणाला हा विषय नाही.
- आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले होते की, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करु, या भूमिकेला कोणी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
- जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.