मुक्तपीठ टीम
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध शोमध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानीच्या प्रकृतीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. दिशा वकानी घशाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात होता. या गोष्टींवर मालिकेचे निर्माते असित मोदी आणि दिशा वकानी यांचे सहकलाकार असलेले दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांची प्रतिक्रिया आली आहे.
दिलीप जोशींची यावर काय आहे प्रतिक्रिया?
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी म्हणाले की, दिशा वकानीबद्दलच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्याला सतत फोन येत आहेत.
- दिलीप जोशी म्हणाले की, सोशल मीडियावर काहीही बातम्या येत आहे.
- सध्या येत असलेली दिशा वकानीची कर्करेगाची बातमी ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही.
त्याचवेळी शोचे निर्माते असित मोदी म्हणाले, ‘दिशा वकानीला कॅन्सर नाही आहे. लोक अशा बातम्या सोशल मीडियावर लाईक्स आणि क्लिक बिटसाठी टाकतात. कॅन्सर तंबाखूच्या सेवनाने होतो, नक्कल केल्याने नाही. दिशा वकानीने २०१७ पासून शोमधून ब्रेक घेतला आहे. दिशा शोमधून प्रसूती रजेवर गेली होती पण त्यानंतर ती अजून परतली नाही. गेल्या काही दिवसांपासून दिशा वाकानी पुन्हा एकदा या शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दिशाने २०१० मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रत्येक वेळी तोच आवाज कायम राखणे खूप कठीण होते, परंतु ही देवाची कृपा आहे की तिच्या आवाजाला कधीही हानी पोहोचली नाही.’