मुक्तपीठ टीम
रेनॉने या महिन्यात भारतीय बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यासाठी खरेदीदारांना निवडक वाहनांवर ५० हजार रूपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत रोख सवलत, स्क्रॅपेज पॉलिसी सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे या महिन्यात जर रेनॉच्या क्विड, ट्रायबर, कायगरमधून कार घ्यायची असेल तर तुम्ही कंपनीने दिलेल्या या ऑफर्सचा फायदा घेता येईल.
रेनॉ क्विडच्या जबरदस्त ऑफरसह…मोठी सवलत!
- रेनॉ क्विड कंपनीने २०१९ मध्ये नवीन अपडेट्ससह लॉंच केली होती.
- जर या महिन्यात रेनॉची क्विड घ्यायची असेल, तर या कारवर तुम्ही एकूण ३५ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता.
- या कारवर दिलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या कारवर १० हजार रुपयांचा रोख लाभ, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १० हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देणार आहे.
- क्विडच्या ०.८ लिटर इंजिनवर १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे.
- या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे.
रेनॉ ट्रायबर ऑफर
- रेनॉच्या ट्रायबर कारमध्ये कंपनीने १.० लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे.
- हे इंजिन ७२बीएचपी पॉवर जनरेट करू शकते आणि ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.
- या कारमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, यावर एकूण ५० हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.
- या कारमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना १५ हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट, २५ हजारांची एक्सचेंज डिस्काउंट आणि १० हजारांची कॉर्पोरेट सूट देत आहे.
- त्याचबरोबर ट्रायबरच्या लिमिटेड एडिशनवर ४५ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.
- या कारमध्ये १० हजारांची कॅश डिस्काउंट, २५ हजारांची एक्सचेंज डिस्काउंट आणि १० हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाणार आहे.
रेनॉ कायगर ऑफर आणि त्यावरील सवलत!
- रेनॉ कायगरवर कमीत कमी सूट देण्यात येत आहे.
- या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. याचे १.० लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ७२ बीएचपी पॉवर जनरेट करते आणि या कारचे १.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन १०० बीएचपी पॉवर जनरेट करू शकते.
- जर ही कार ऑक्टोबर महिन्यात खरेदी केली तर, त्यावर एकूण १० हजार रुपयांची बचत करू शकाल. यामध्ये कंपनी फक्त १० हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.