Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘झी २४ तास’ फ्री डिशमागोमाग बार्क रेटिंगमध्येही नाही! झीच्या माघारीनंतर ५ चॅनल्समध्येच स्पर्धा, टीव्ही9मराठी नंबर१!

October 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Tv 9 MArathi Again No 1

मुक्तपीठ टीम

मराठीत ७ न्यूज चॅनल्स आहेत. त्यातील जय महाराष्ट्रची नोंद बार्कच्या आकडेवारीत नसते. आता झी २४ तासनेही बार्कमधून माघार घेतली आहे. त्यामुळे या ३९व्या आठवड्यापासून टीआरपी स्पर्धेत आता पाचच मराठी न्यूज चॅनल्स उरले आहेत. फ्री डिशवरून झी वाहिन्यांचे प्रसारण बंद झाल्यानंतर झी २४ तासने बार्कमधून आपल्या चॅनलची नोंद बंद केली असली तरी त्यासाठी लँडिंग पेजचं कारण दिलं आहे. झी २४ तासच्या माघारीनंतर स्वाभाविकच एक स्पर्धक कमी झाल्यानंतर अन्य ५ मराठी चॅनल्सना त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार बुस्टर डोस मिळाले आहेत. टीव्ही ९ मराठी आता ३४.२ मार्केट शेअरसह मोठ्या फरकाने पहिल्या क्रमांकावर आहे. तर सतत तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझाला २३.३ मार्केट शेअरसह दुसरा क्रमांक पटकावता आला आहे. इतर तीन चॅनल्सनाही चांगला फायदा झाला आहे.

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम (आठवडा ३९वा )

  • १ – टीव्ही ९ मराठी ३४.२%
  • २ – एबीपी माझा २३.३%
  • ३ – साम १८.५%
  • ४ – न्यूज १८ लोकमत १६.००%
  • ५ – लोकशाही ८.००%

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम

आठवडा ३९ ३८ ३७ ३६ ३५ ३४ ३३
टीव्ही ९ मराठी ३४.२ २५.०० २५.१ २५.५ २५.१ २५.४ २५.६
एबीपी माझा २३.३ १७.७ १७.७ १८.२ १८.०० १८.२ १८.३
साम १८.५ १३.७ १७.७ १३.२ १३.५ १३.२ १२.९
न्युज १८ लोकमत १६.०० ११.९ ११.९ ११.९ ११.९ ११.७ ११.५
लोकशाही ८.०० ५.८ ५.८ ५.८ ६.०० ६.०० ५.७
झी २४ तास NA २५.९ २५.८ २५.३ २५.५ २५.५ २६.०

मराठी न्यूज चॅनल्सच्या मार्केटमध्ये काय घडलं, काय बिघडलं?

  • या वर्षाच्या ३९व्या आठवड्यात झी २४तासने बार्कमधून माघार घेतली आहे. त्यामुळे स्वाभाविकच आता ६ऐवजी ५ चॅनल्समध्येच मार्केट शेअर वाटला जाणार आहे.
  • टीव्ही ९ मराठीचा मार्केट शेअर ३४.२सह पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळे टीव्ही9मराठी आता १०.९ टक्के मार्केट शेअरने नजिकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा पुढे आहे.
  • एबीपी माझा २३.३ टक्के मार्केट शेअरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • साम १८.५ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • न्यूज 18 लोकमत १६ % मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • लोकशाही ०८ % मार्केट शेअरसह सहाव्या क्रमांकावर आहे.
  • झी २४ तासने माघार घेतल्याने त्यांची आकडेवारी उपलब्ध नाही.

खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठीत टीव्ही ९ मराठी, एबीपी माझा, साम, न्यूज १८ लोकमत, लोकशाही, जय महाराष्ट्र हे ७ न्यूज चॅनल्स आहेत.
  • त्यातील जय महाराष्ट्रची आकडेवारी बार्कवर आधीपासूनच नसते. आता झी २४ तासनेही माघार घेतल्याने त्यांचीही आकडेवारी नसेल.
  • त्यामुळे आता मराठी न्यूज चॅनल्सचे रेटिंग हे पाच न्यूज चॅनल्सच्या आकडेवारीवरच आधारीत असेल.
  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल होते. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के
    अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळत होती. त्यांच्याविरोधात माहिती प्रसारण खात्याने कारवाई करत काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रसारभारतीच्या फ्री डिशवरील प्रसारण थांबवले. त्यानंतर त्यांनी लँडिंग पेजचं कारण देत बार्कमधून माघार घेतली आहे.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असत नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा –  ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)


Tags: BARC RatingFree DishMarathi News ChannelTV 9 MarathiTV RatingZEEZee 24 Taasझीझी २४ तासटीव्ही रेटिंगटीव्ही9मराठीफ्री डिशबार्क रेटिंगमराठी न्यूज चॅनल्स
Previous Post

“साखरपुडा झाला याचा अर्थ वाग्दत्त वराला भावी वधुशी वाट्टेल तसं वागण्याचा परवाना नाही!”

Next Post

फ्री डिशवरून बाहेर गेलेली झी मीडियाची न्यूज चॅनल्स बार्क रेटिंग स्पर्धेमधून बाहेर का? जाणून घ्या कारण…

Next Post
Zee And BARC

फ्री डिशवरून बाहेर गेलेली झी मीडियाची न्यूज चॅनल्स बार्क रेटिंग स्पर्धेमधून बाहेर का? जाणून घ्या कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!