Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“साखरपुडा झाला याचा अर्थ वाग्दत्त वराला भावी वधुशी वाट्टेल तसं वागण्याचा परवाना नाही!”

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Delhi High Court

मुक्तपीठ टीम

केवळ लग्न ठरलं म्हणून किंवा साखरपुडा झाला म्हणून, वराला भावी वधुशी वाट्टेल तसं वागता येणार नाही यावर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. एका ठिकाणी हा प्रकार घडला असता दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, केवळ साखरपुडा झाला म्हणून आरोपीला लैंगिक छळ, मारहाण किंवा धमक्या देण्याची परवानगी नाही आहे. कलम ३७६ आणि ३२३ अंतर्गत १६ जुलै रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी १६ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी आरोपीने केलेला युक्तिवाद फेटाळून लावताना असे निरीक्षण नोंदवले की, दोन्ही पक्ष यात सामिल असल्याने लग्नाचे खोटे वचन दिले होते असे म्हणता येणार नाही. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, तसेच, या युक्तिवादाला कोणतेही बल नाही कारण केवळ साखरपुडा झाला याचा अर्थ असा नाही की, पीडितेवर लैंगिक अत्याचार, मारहाण किंवा आरोपीकडून धमकी दिली जाऊ शकते. न्यायालयाने सांगितले की, आरोपानुसार आरोपीने लग्नाच्या बहाण्याने पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले होते.

पीडितेचे आरोपीवर बळजबरी करून शारीरिक संबंध आणि मारहाणीचा आरोप!

  • पीडितेने आरोप केला होता की, ऑक्टोबर २०२० पासून आरोपीशी मैत्री केल्यानंतर आणि जवळपास एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने साखरपुडा केला.
  • एफआयआरनुसार, साखरपुड्याच्या चार दिवसांनंतर, आरोपीने पीडितेला लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून शारीरिक बळजबरी केली आणि संबंध ठेवले.
  • पीडितेने आरोप केला आहे की, आरोपीने तिला दारूच्या नशेत बेदम मारहाण केली आणि अनेक वेळा तिच्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले ज्यामुळे ती गर्भवती राहिली.
  • यानंतर आरोपीने तिला काही गोळ्या दिल्या आणि गर्भपात करून घेतला.

आरोप निश्चित करणे बाकी आहे, परंतु आरोपीला जामीन मंजूर करणे योग्य नाही- दिल्ली उच्च न्यायालय

  • एफआयआरमध्ये आरोप आहे की, पीडित मुलगी ९ जुलै रोजी आरोपीच्या घरी गेली तेव्हा आरोपीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला.
  • दिल्ली न्यायालयाने सांगितले की, ही गंभीर स्वरूपाची बाब आहे, ओरापीने तिला गोळ्या देऊन गर्भपात केला.
  • पीडित महिला, जी अविवाहित आहे, तिने तिचा सन्मान वाचवण्याच्या कारणास्तव याचा पुरावा ठेवला नाही.
  • अशा प्रकारे गुन्ह्याची गंभीरता हे आरोपांचे स्वरूप आहे आणि आरोप निश्चित करणे बाकी आहे आणि खटला सुरू होणे बाकी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
  • जामीन मंजूर करण्यासाठी हे प्रकरण योग्य नाही.

Tags: Bail RejectionDelhi High CourtLawmuktpeethPromised Groom-Prospect Brideकायदाघडलं-बिघडलंजामीन फेटाळणेदिल्ली उच्च न्यायालयमुक्तपीठवाग्दत्त वर-भावी वधु
Previous Post

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजनेसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी

Next Post

‘झी २४ तास’ फ्री डिशमागोमाग बार्क रेटिंगमध्येही नाही! झीच्या माघारीनंतर ५ चॅनल्समध्येच स्पर्धा, टीव्ही9मराठी नंबर१!

Next Post
Tv 9 MArathi Again No 1

'झी २४ तास' फ्री डिशमागोमाग बार्क रेटिंगमध्येही नाही! झीच्या माघारीनंतर ५ चॅनल्समध्येच स्पर्धा, टीव्ही9मराठी नंबर१!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!