Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिशाभूल करुन सहसचिवांचा परस्पर निर्णय, मंत्री रविंद्र चव्हाण यांचा नोकरशाहीला जोरदार झटका

October 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Public Works Minister Ravindra Chavan

मुक्तपीठ टीम

मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागाच्या सहसचिवाला आज जोरदार झटका दिला आहे. एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या अधिका-याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच मंत्री कार्यालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करणा-या या अधिका-याची तातडीने चौकशी करुन दोषी विरुध्द कारवाई करण्याचे आदेशही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार विभागात खपवून घेतले जाणार नाही अशी यापूर्वीच ताकिद दिली होती. विभागाचा कारभार हा पूर्णपणे स्वच्छ व पारदर्शक असला पाहिजे असेही मंत्री चव्हाण यांनी वेळोवेळी स्पष्ट केली होती. त्यामुळे सदर गंभीर प्रकार निर्दशनास आल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी प्रतिनियुक्तीने विभागात कार्यरत असणारे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधिर देवदत्त तुंगार यांची रवानगी तात्काळ मूळ विभागात करण्याचे आदेश दिले आहेत. तुंगार यांनी हेतुपुरस्सरपणे केलेली कृती ही शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी असल्याची आहे, त्यामुळे या प्रकरणात सहसचिव तुंगार हे प्रथम दर्शनी जबाबदार असल्याचे निर्दशनास आले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे लेखी आदेश मंत्री चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यातील धानापासून तयार झालेल्या सि.एम.आर (तांदूळ) इतर जिल्ह्यांना उचल व वाटप करण्यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्यास शासनाची मान्यता घेण्याचा २०२० मधील शासन निर्णय आहे. परंतु या प्रकरणामध्ये विभागाने या विषयाबाबतच्या नस्ती (फाईल)वर मंत्री चव्हाण यांची मान्यता न घेता व यासंदर्भातील निर्णय परस्पर घेतला. एवढेच नव्हे तर २० सप्टेंबर २०२२ च्या पत्रान्वये उचल व वाटप करण्यासंदर्भात सूचना दिल्या. विशेष म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर सदर नस्ती (फाईल) केवळ सोपस्कर म्हणून मंत्री चव्हाण यांच्या अवलोकनार्थ म्हणून सादर केली. मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन व त्यांना अंधारात ठेऊन तुंगार यांनी कृती केल्याचे उघड झाले. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. नजिकच्या काळात विभागामध्ये अश्या प्रकारची कुठलीही गैरकृती खपवून घेतली जाणार नाही असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.


Tags: bureaucracyJoint SecretaryMinister Ravindra ChavanMinister's Officemuktpeethघडलं-बिघडलंनोकरशाहीमंत्री कार्यालयमंत्री रविंद्र चव्हाणमुक्तपीठसहसचिव
Previous Post

आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ शिंदे गटाचं नंबर १ लक्ष्य! शिंदे गटात कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर आणखी मोठ्या धक्क्याची तयारी!!

Next Post

‘रिपाइं’ प्रदेश कार्यकारिणीत ॲड. मंदार जोशी यांची निवड

Next Post
Republican Party of India

'रिपाइं' प्रदेश कार्यकारिणीत ॲड. मंदार जोशी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!