Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ शिंदे गटाचं नंबर १ लक्ष्य! शिंदे गटात कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर आणखी मोठ्या धक्क्याची तयारी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde And Aditya Thackeray

मुक्तपीठ टीम

दसरा मेळावा अवघा तीन दिवसांवर ठेपलेला असताना शिंदे गटानं शिवसेनेला नवा धक्का दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरून बंडखोरांविरोधात शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून वातावरण पेटवत आहेत. त्यामुळेच त्यांनाच त्यांच्या मतदारसंघात अडचणीत आणण्याच्या रणनीतीवर शिंदे गट काम करत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोळीबांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन हा प्रवेश केला आहे. हा प्रवेश रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. शिंदे गटानं वरळी मतदारसंघ लक्ष्य करणं हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी संकट मानलं जात आहे.

वरळीचं शिवसेनेसाठी महत्व!

  • लालबाग, परळ प्रमाणेच वरळी हा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
  • शिवसेना नेते दत्ताजी नलावडेंच्या सतत १९९०, १९९५, १९९९, २००४ चार निवडणुकीतील विजयांची परंपरा २००९मध्ये सचिन अहिरांनी खंडित केली.
  • २०१४मध्ये सुनिल शिंदेंनी ती परंपरा पुन्हा सुरु झाली आणि आता आदित्य ठाकरेंपर्यंत ती परंपरा कायम आहे.
  • २०१९च्या निवडणुकीत सचिन अहिरांनाच शिवसेनेत आणून होतं तेही आव्हान संपवण्यात आलं.
  • मात्र, तिथून शिवसेना नेते आदित्य ठाकरे निवडून येत असल्याने तिथंच शिवसेनेला कमजोर करण्याची शिंदे गटाची रणनीती दिसत आहे.
  • त्यासाठी आधी गणेशोत्सवात आणि आता नवरात्रोत्सवातही वरळीतील मंडळांना मोठ्या प्रमाणावर महत्व देण्यात आलं.
  • विरोधात असणारं कुणीही असलं तरी त्यांना गळास लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

शिंदे गटात जाहीर प्रवेश…

  • आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते.
  • वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.
  • आज वरळीतील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
  • त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

शिंदे गटाचे पावसकर म्हणतात, धक्का आणखी बाकीच!

  • वरळीतील शिवसैनिकांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिंदे गटाचे नेते किरण पावसकरांची प्रतिक्रिया शिवसेनेला धोक्याचे संकेत देणारी आहे.
  • हा धक्का नाहीये, धक्का तर आणखी बाकी आहे.
  • अजून अनेकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे.
  • हाच खरा जनतेचा मुख्यमंत्री अशी भावना नागरिकांची आहे.

Tags: aditya thackerayEknath ShindeShivsenaworliआदित्य ठाकरेवरळीशिंदे गटशिवसेना
Previous Post

जिद्द, आत्मविश्वास व परिश्रमाने उद्योगात यश

Next Post

दिशाभूल करुन सहसचिवांचा परस्पर निर्णय, मंत्री रविंद्र चव्हाण यांचा नोकरशाहीला जोरदार झटका

Next Post
Public Works Minister Ravindra Chavan

दिशाभूल करुन सहसचिवांचा परस्पर निर्णय, मंत्री रविंद्र चव्हाण यांचा नोकरशाहीला जोरदार झटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!