मुक्तपीठ टीम
प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा झेडवरून झेडप्लस केली आहे. आयबीने गुप्त माहिती दिल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.
म्हणून करण्यात आली अंबानींच्या सुरक्षेत वाढ!
- अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याच्या प्रकरणानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्याचा विचार सुरु होता.
- दरम्यान, सद्यस्थितीत पेमेंट बेसिसवर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
- इंटेलिजन्स ब्युरोने मुकेश अंबानींच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल केंद्राल सादर केला आहे.
झेड प्लस श्रेणीची सुरक्षा?
- ५८ कमांडो तैनात असतात.
- १० सशस्त्र स्टॅटिक गार्ड.
- ६ पीएसओ.
- २४ जवान.
२ एस्कॉर्ट २४ तास. - ५ वॉचर्स २ शिफ्टमध्ये तैनात.
- एक इन्स्पेक्टर किंवा सबइन्स्पेक्टर प्रभारी म्हणून तैनात.
- व्हीआयपींच्या घरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी ६ फ्रीस्कींग आणि स्क्रीनिंग करणारे तैनात.
- ६ ड्रायव्हर देखील आळीपाळीने ड्युटीवर असतात.
- सीआरपीएफ सध्या अंबानींच्या निवासस्थान आणि कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवतील.








Subscribe