मुक्तपीठ टीम
एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डींग्ज आणि फॅक्टरी व्यवसायाला आसाम राज्य सरकारकडून आसाममधील गोलाघाट येथे नवे वैद्यकीय कॉलेज व रूग्णालय उभारण्याचे कंत्राट मिळाले आहे. हे कंत्राट अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीचे आहे. या बांधकामामध्ये ४३० बेड्सचे टीचिंग रूग्णालय, वार्षिक पातळीवर १०० ची क्षमता असलेला शैक्षणिक विभाग, खासगी विभाग आणि निवासी सुविधा यांचा समावेश असेल. हा प्रकल्प एनएमसी नियमांनुसार आणि ३६ महिन्यांत पूर्ण केला जाईल. प्रकल्पाचा एकूण बिल्ट अप एरिया ९.४४ लाख चौरस फूट असेल.
प्रकल्पाच्या कामात पायलिंग, सिव्हिल स्ट्रक्चर, फिनिशेस आणि पूरक एमईपी सेवा, पुरवठा, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि वैद्यकीय गॅस पाइप कार्यान्वित करणे, मोड्युलर ओटी इत्यादी तसेच परिसर विकासासह इतर विकास कामांचा समावेश असेल.
कंपनीला आणखी एका प्रतिष्ठित ग्राहकाकडून बंगळुरू येथे अंदाजे १० लाख चौरस फुट जागेत व्यावसायिक कार्यालयाचे बांधकाम करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या प्रकल्पाच्या कामात 3B+G+12 मजल्यांसह संयुक्त बांधकाम, डिझाइन आणि नागरी कामाचा समावेश आहे. या प्रकल्पाचे डिझाइन, समन्वय आणि देखरेखी बीआयएम ‘बिल्ड अँड कोलॅबरेशन मोड्युल’ वापरून डिजिटल पद्धतीने केली जाणार असून तो १२ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
त्याशिवाय कंपनीला विमानतळ, सार्वजनिक जागा, कारखाने, कार्यालयीन जागा आणि डेटा सेंटर्स क्षेत्रातील विविध प्रकारची कंत्राटे मिळाली आहेत.