मुक्तपीठ टीम
इंडियन ऑइलमध्ये केमिकल प्लांट ट्रेड अॅप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर, फिटर ट्रेड अॅप्रेंटिस, बॉयलर ट्रेड अॅप्रेंटिस, केमिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, मेकॅनिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, इलेक्ट्रिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निशियन अॅप्रेंटिस, सेक्रेटेरियल असिस्टंट ट्रेड अॅप्रेंटिस, अकाउंटंट ट्रेड अॅप्रेंटिस, फ्रेशर डाटा एंट्री ऑपरेटर ट्रेड अॅप्रेंटिस, स्कील डाटा एंट्री ऑपरेटर ट्रेड अॅप्रेंटिस या पदांसाठी अशा एकूण १ हजार ५३५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- पीसीएम/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री विषयात बी.एससी
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय फिटर
- पद क्र.३- पीसीएम/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री विषयात बी.एससी
- पद क्र.४- केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.५- मॅकेनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.६- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.७- इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.८- बीए/ बीएससी/ बीकॉम
- पद क्र.९- बीकॉम
- पद क्र.१०- १२वी उत्तीर्ण
- पद क्र.११- १) १२वी उत्तीर्ण २) ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ मध्ये कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ किंवा २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://www.iocl.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_oct21.aspx
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1oCsnd-jF25tpr3BoYSNQKRtXTXm2zQJg/view