मुक्तपीठ टीम
आशियातील सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी ‘नो-पोचिंग’ करार केला आहे. याअंतर्गत रिलायन्स समूह आणि अदानी समूहाच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या समूह कंपन्यांमध्ये काम करता येणार नाही. याद्वारे दोन्ही समूह कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कंपन्यात काम करण्यापासून रोखता येईल. हा करार या वर्षी मे महिन्यापासून लागू झाला असून दोन्ही कंपन्यांशी संबंधित सर्व व्यवसायांसाठी आहे.
यावेळी केला करार…
- हा करार यावर्षी मे महिन्यात आणण्यात आला असून तो या दोन समूहाच्या सर्व व्यवसायांना लागू होईल.
- दोन्ही समूहांमधील स्पर्धा स्पष्टपणे दिसून येत आहे.
- कारण अदानी समूहाचा व्यवसाय झपाट्याने वाढत असताना रिलायन्स समूहाचे आधीच मोठे नाव आहे, अशा व्यवसायांमध्ये आता अदानी समूह हळूहळू पाय रोवत आहे.
- याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी ‘अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ सोबत अदानी समूहाने पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात प्रवेश केला, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आधीच वर्षानुवर्षे देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून कार्यरत आहे.
टेलिकॉम क्षेत्रातही दोन्ही समूहात स्पर्धा:
- पेट्रोकेमिकल्सशिवाय अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी पहिले पाऊल टाकले आहे.
- 5G स्पेक्ट्रमवरून दोन अब्जाधीश कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.
- अदानीने हाय-स्पीड डेटा क्षेत्रात 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे.
- तर या व्यवसायातही रिलायन्स आधीच अग्रसेर आहे.
किती कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?
- मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील करारामुळे लाखो कर्मचाऱ्यांसाठी आता मार्ग बंद झाला आहे.
- मुकेश अंबानींच्या कंपन्यांमध्ये ३ लाख ८० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत, तर अदानींच्या कंपन्यांमध्ये २३ हजार कर्मचारी काम करत आहेत.
- मे महिन्यापासून लागू झालेल्या या करारानंतर आता या दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी एकमेकांसोबत काम करू शकणार नाहीत.