मुक्तपीठ टीम
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरसंचार बैठकीत एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या बैठकीत बीएसएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला डुलकी लागली. त्यानंतर त्या बैठकीतून बाहेर काढण्यात आले आणि स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आले आहे.
एका सीजीएमला झोप लागली…
- केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलची स्थिती सुधारवण्यासाठी १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली आहे.
- दरम्यान हा प्रकल्प दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खूप गांभीर्याने घेतला होता.
- ऑगस्टमध्ये, अखिल भारतीय मुख्य महाव्यवस्थापक (CGM) स्तरावरील बैठकीत बीएसएनएलच्या कर्मचार्यांना चांगली कामगिरी करा अथवा व्हीआरएस घ्या असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते.
- या बैठकीतही अश्विनी वैष्णव महत्वाची चर्चा करत असताना एका सीजीएमला झोप लागली.
व्हीआरएस मंजूर झाला!!
- बैठकीत सीजीएमला डुलकी घेताना अश्विनी वैष्णव यांनी पकडले आणि ते संतापले.
- त्यांनी सीजीएमला ताबडतोब बैठकीत बाहेर जाण्यास सांगितले.
- सीजीएमला व्हीआरएस घेण्यास सांगितले.
- दरम्यान सीजीएमचा व्हीआरएस मंजूर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
- हा अधिकारी बंगळुरूमध्ये क्वालिटी अॅश्युरन्स आणि इन्स्पेक्शन (CGM) म्हणून काम करत होता.
सरकार सक्तीच्या निवृत्तीचे नियम लागू करू शकते…
वैष्णव यांनी बैठकीत सांगितले की, जे काम करू शकत नाहीत ते व्हीआरएस घेऊ शकतात आणि घरी आराम करू शकतात आणि अशा अधिकाऱ्यांना व्हीआरएस घेण्यास काही संकोच वाटत असेल तर सरकार रेल्वेप्रमाणेच सक्तीच्या निवृत्तीचे नियम लागू करू शकते.