केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएसची मुख्य परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय वन सेवातील परिक्षेच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सदर आयएफएस २०२०-२१ ची परिक्षा २८ फेब्रुवारी २०२१ ला होणार असून अखेरचा पेपर ७ मार्च २०२१ ला असेल.
परिक्षेचे वेळापत्रक
- २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळच्या सत्रात जनरल इंग्लिश तर दुपारच्या सत्रात जनरल नॉलेज विषयाचे पेपर
- २ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात मॅथेमॅटिक्स पेपर १ / स्टॅटेस्टिक्स पेपर १ तर दुपारच्या सत्रात मॅथेमॅटिक्स पेपर २ / स्टॅटेस्टिक्स पेपर २
- ३ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात फिजिक्स पेपर १ / झुऑलॉजी पेपर १ तर दुपारच्या सत्रात फिजिक्स पेपर २ / झुऑलॉजी पेपर २
- ४ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात केमिस्ट्री पेपर १ / जिऑलॉजी पेपर १ तर दुपारच्या सत्रात केमिस्ट्री पेपर २ / जिऑलॉजी पेपर २
- ५ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात अॅग्रीकल्चर पेपर १ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर १ तर दुपारच्या सत्रात अॅग्रीकल्चर पेपर २ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर २
- ६ मार्च २०२१ रोजी फॉरेस्ट्री पेपर १ / फॉरेस्ट्री पेपर २
- ७ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर १ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर १ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर १ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर १ / बॉटनी पेपर १ तर दुपारच्या सत्रात अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर २ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर २ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर २ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर २/ बॉटनी पेपर २
तसेच अधिक माहितीसाठी उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावरून माहिती मिळवू शकता.