मुक्तपीठ टीम
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज १५ वा दिवस…काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. दरम्यान भारत जोडो यात्रा ही केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात पोहोचताच पक्षाची एक चूक समोर आली आहे. भारत जोडोच्या पोस्टरमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या रांगेत लावला आहे. नंतर काँग्रेसने त्यांची चूक महात्मा गांधीचा फोटो लावून सुधारण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्ष सावरकरविरोधी भूमिकेसाठी ओळखला जातो. काँग्रेसने कायमच सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक नाहीत अशी भूमिका मांडली आहे. राहुल गांधींनीही अनेकदा या मुद्द्यावरुन टीका केली आहे. असं असताना काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सावरकरांचा फोटो स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंसोबत झळकल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेवरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भारत जोडो यात्रेच्या पोस्टरमध्ये वीर सावरकरांचा फोटो
- काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा १४ वा दिवस एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आला.
- काँग्रेसकडून या यात्रेसाठी लावण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पोस्टरमध्ये वीर सावरकर यांचा फोटोही लावण्यात आला आहे.
- जेव्हा हे फोटो व्हायरल होऊ लागले तेव्हा काँग्रेसला आपली चूक लक्षात आली.
- यासंबंधित एक व्हिडीओही समोर आला आहे.
- त्यामध्ये एक कार्यकर्ता वीर सावरकरांच्या फोटोवर महात्मा गांधी यांचा फोटो चिटकवताना दिसत आहे.
- या पोस्टरबाबत काँग्रेसने स्पष्टीकरणही दिले आहे.
काँग्रेसचे स्पष्टीकरण
- हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काँग्रेसने एक निवेदन जारी करून घाईगडबडीत चुकीने पोस्टर छापण्यात आल्याचे म्हटले आहे.
- काँग्रेसने याला प्रिंटिंग मिस्टेक म्हटले आहे.
- या पोस्टरची छापई करणाऱ्यांना सर्व सातंत्र्यसैनिकांचे फोटो वापरण्यास सांगण्यात आलं होतं.
- त्यामुळे कोणतीही क्रॉस चेकिंग न करता ऑनलाइन सर्च करुन पोस्टर तयार करण्यात आले, असे काँग्रेसने म्हटले.
भाजपाचा काँग्रेला टोला…
- सावरकरांच्या या पोस्टवरवरुन भाजपानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
- भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं की, वीर सावरकरांचा फोटो एर्नाकुलम (विमानतळाच्या जवळ) काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेला शोभून दिसत आहे. उशीरा असलं तरी राहुल गांधींना याची जाणीव झाली हे चांगलं आहे. हे तेच राहुल गांधी आहेत ज्यांच्या पणजोबांनी म्हणजेच नेहरुंनी माफीनामा लिहून पंजाबमधील नाभा तुरुंगामधून केवळ दोन आठवड्यांमध्ये स्वत:ची सुटका करुन घेतली होती.
- शहाजाद पुनावाला यांनी म्हटलं की, राहुलजी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी इतिहास आणि सावरकरांबद्दलचं सत्य समोर आलं. जे हे लपवतात ते भित्रे आहेत.
Veer Savarkar’s pictures adorn Congress’s Bharat Jodo Yatra in Ernakulum (near airport). Although belated, good realisation for Rahul Gandhi, whose great grandfather Nehru, signed a mercy petition, pleaded the British to allow him to flee from Punjab’s Nabha jail in just 2 weeks. pic.twitter.com/i8KxicPl1y
— Amit Malviya (@amitmalviya) September 21, 2022